ताज्या घडामोडीनिपाणी परिसर

एम.डी. विद्यालयात सेवनिवृत्ती निमित्त श्रीमती एस बी पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न

जनता शिक्षण मंडळाचे विश्वस्त श्री. प्रकाशभाई शाह यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला

Kiran G.Patil M.No.8884357516

येथील मोहनलाल दोशी विद्यालयात 31 वर्षे सेवा बजावणाऱ्या कलाशिक्षिका श्रीमती एस बी पाटील यांचा सेवनिवृत्ती निमित्त सत्कार समारंभ पार पडला

यावेळी प्रमुख पाहुणे जनता शिक्षण मंडळाचे विश्वस्त श्री. प्रकाशभाई शाह यांच्या हस्ते रोपटे,शाल,श्रीफळ व सन्मानपत्र देऊन पाटील दाम्पत्यांचा सत्कार करण्यात आला

यावेळी श्री प्रकाश शाह यांनी सत्कार मूर्तींच्या कामाचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रारंभी मुख्याध्यापिका श्रीमती एस एम गोडबोले यांनी प्रास्ताविकातून सत्कारमूर्तींनी निरपेक्ष सेवा बजावल्या बद्दल कौतुक केले.तसेच स्वागत शिक्षक प्रतिनिधी श्रीमती आर आर कपले यांनी केले तर ,श्री एस एस सांडगे यांनी मानपत्राचे वाचन केले तर कु.ज्ञानेश्वरी पोवार,कु शांभवी टिकले, कु मगदूम यांनी आपल्या मनोगतातुन आठवणी सांगून शुभेच्छा दिल्या

सत्कारप्रसंगी मनोगत व्यक्त करताना श्रीमती पाटील यांनी सर्वांप्रति कृतज्ञता व्यक्त केली ” यावेळी व्यासपीठावर जेष्ठ शिक्षक श्री आर एस भोसले माजी मुख्याध्यापक श्री पी वाय पाटील व अक्षय पाटील आदि मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन श्री आर डी देसाई यांनी केले तर आभार डी बी बेनाडे यांनी मानले. कार्यक्रमाला जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री आशिषभाई शाह,यांच्यासह सर्व संचालक पदाधिकाऱ्यांचे प्रोत्साहन लाभले

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!