क्राईमताज्या घडामोडीनिपाणी परिसर

यमगर्णी सहारा हॉटेल नजीक अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी ठार!

रस्ता ओलांडताना झाला अपघात! दस्तगीर शेखजी जागीच ठार

Kiran G Patil M.No.8884357516

पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाचे सहा पदरीकरणाचे काम अतिशय वेगाने चालू असून, त्याच वेगाने अपघाताचे प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढत असल्याचे विदारक चित्र निर्माण झाले आहे.

काल संध्याकाळी आपले हॉटेलमधील काम संपवून रस्ता क्रॉस करताना दस्तगीर शेखजी वय (60) रा यमगर्णी या इसमास एका अज्ञात वाहनाच्या धडकेत आपला जीव जागीच गमावावा लागल्यामुळे चौपदरीकरणाचे काम परत एकदा चव्हाट्यावर आले आहे.या इसमास धडक इतक्या जोराची बसली की त्याचा जागीच मृत्यू झाला. पण वाहन चालकाने अपघात झाल्यानंतर आपली गाडी न थांबवता सुसाट निघून गेल्यामुळे पोलीस यंत्रणा अधिक तपास करत आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!