क्रीडाताज्या घडामोडीमहाराष्ट्र
देवचंदच्या दोन विद्यार्थिनींची पश्चिम विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड!.
शिवाजी विद्यापीठ संघातून महाराज छत्रसाल बुंदेलखंड विद्यापीठ छत्रपूर येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
देवचंद महाविद्यालयाच्या व्हॉलीबॉल खेळाडू कु.शुभांगी खामकर व कु. तेजस्विनी मगदूम यांची शिवाजी विद्यापीठ संघातून महाराज छत्रसाल बुंदेलखंड विद्यापीठ छत्रपूर येथे होणाऱ्या पश्चिम विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.विजयी खेळाडूंना जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा.आशिष शाह उपाध्यक्ष डॉ.सौ. तृप्तीभाभी शाह खजिनदार मा .सुबोध शाह यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सौ.जी.डी. इंगळे उपप्राचार्य डॉ.पी.पी. शाह जिमखाना प्रमुख डॉ. रवींद्र चव्हाण, प्रा. निरंजन जाधव जिमखाना कर्मचारी श्री. अनंत घोळवे श्री. संतोष वागळे व श्री. वैभव सोनार यांचे मार्गदर्शन लाभले विजयी खेळाडूंचे महाविद्यालयातील सर्व घटकांमार्फत हार्दिक अभिनंदन होत असुन राष्ट्रीय स्पर्धे करिता शुभेच्छा देण्यात येत आहेत.