ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

उद्या शिवाजी विद्यापीठात “स्क्रीप्ट टू स्क्रीन”या विषयावर कार्यशाळेचे आयोजन!

पुणे येथील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि 'पडद्यामागची गोष्ट' या पुस्तकाचे लेखक सुनिल नाईक करणार मार्गदर्शन!

किरण गोपाळराव पाटील मो.न.8884357516

नेहमीच नवनवीन उपक्रम राबवून ज्ञान संपादित करून आजच्या आधुनिक युगात विद्यार्थिनी कार्यतत्पर राहण्याच्या दृष्टीने नेहमीच अग्रेसर असणाऱ्या शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या व एम.ए. मास कम्युनिकेशन यांच्या वतीने येत्या शनिवारी (दि. 9) चित्रपट विषयक एकदिवसीय कार्यशाळा आयोजित केली आहे.

पुणे येथील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि ‘पडद्यामागची गोष्ट’ पुस्तकाचे लेखक सुनिल नाईक ‘स्क्रीप्ट टू स्क्रीन’ ( script to screen) या विषयावर कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत. पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या इमारतीत सकाळी 10.30  वाजता कार्यशाळेचे उद्घाटन होईल. दुपारी 4.30 वाजता‌ कार्यक्रमाचा समारोप होईल. ही कार्यशाळा विनामूल्य असून सर्वांसाठी खुली आहे. कार्यशाळेत सहभागी  होणाऱ्या विद्यार्थ्यास प्रमाणपत्र दिले जाणार आहे. सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी नाव नोंदणीसाठी https:// forms. gle / 1 ydxCyceBtXh2 Cwy7 ही लिंक भरून सबमिट करावी.अधिक माहिती साठी पत्रकारिता अध्यासन तसेच मास कम्युनिकेशन विभागात संपर्क साधावा, असे आवाहन विभागाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!