क्रीडाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिवाजी विद्यापीठातील मास कम्युनिकेशनच्या “मीडिया स्पेक्ट्रम” चे प्रकाशन

विशेषांकाचे प्रकाशन कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते व्यवस्थापन परिषद हॉलमध्ये करण्यात आले.

Kiran G.Patil M.No.8884357516

गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अनेक भाषेतील दर्जेदार चित्रपटांची मेजवानी अनेक सिनेरसिक प्रत्येक वर्षी अनुभवतात, हाच आनंद यांची देही, याची डोळा पाहण्यासाठी शिवाजी विद्यापीठातील मास कम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांना संधी मिळाली त्या संधीचे सोने करत शिवाजी विद्यापीठाच्या या विभागातील विद्यार्थ्यांनी गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवावर आधारित तयार केलेल्या “मीडिया स्पेक्ट्रम” या विशेषांकाचे प्रकाशन कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते व्यवस्थापन परिषद हॉलमध्ये करण्यात आले.

प्रास्ताविक मास कम्युनिकेशनचे विभागाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी केले. मास कम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांनी गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभाग नोंदवला होता. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध देशातील चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेत्यांशी चर्चा करून माहिती संकलित केली होती. या माहितीचे संकलन असलेला “मीडिया स्पेक्ट्रम” हा विशेषांक विद्यार्थ्यांनी तयार केला.

‘मीडिया स्पेक्ट्रम ‘च्या चित्रपट महोत्सव विशेषांकाचे प्रकाशन करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के सोबत मान्यवर.

अंकाचे संपादन डॉ. शिवाजी जाधव यांनी केले आहे. यावेळी कुलगुरू प्रा.डॉ. शिर्के म्हणाले, विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करून जनसामान्यांशी संवाद साधला पाहिजे. मुद्रीत माध्यमां बरोबरच इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांचा उपयोग विद्यार्थ्यांनी करावा. चित्रपट महोत्सवात सहभागी साई सिमरन घाशी, मेलीना कालिचुर्ण, सूरज कांबळे, अथर्व यज्ञोपवित, दिव्या कांबळे, सचिन बनसोडे यांनी अनुभव सांगितले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, उपकुलसचिव गजानन पळसे, डॉ. प्रसाद ठाकूर आदी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!