क्राईमताज्या घडामोडीनिपाणी परिसर

भिमापुरवाडी जवळील अपघातात एक ठार!

मयत गळतगा येथील रहिवासी असल्याचे समजते!

Kiran G.Patil M.No.8884357516

सध्या साखर कारखान्याचा हंगाम थोड्या वेळाने सुरू झाला आहे. त्यातच अनेक ठिकाणी रस्त्याचे काम सुरू असल्याने सर्वत्र वाहतूकीस अडचणी निर्माण होतात. त्यामुळे अनेक अपघात झाल्याचे आपण दररोज पाहतो.
Table of Contents
आज सकाळी साडेनऊच्या सुमारास निपाणी इचलकरंजी मार्गावरील भिमापुरवाडी जवळील झालेल्या अपघातात एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला असल्याचे समजते.
घटनास्थळावरून व सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार मयत व्यक्तीची ओळख पटली असून तो गळतगा येथील रहिवासी असल्याचे समजते. दुचाकीस्वार ममदापूर येथुन गळतग्याच्या दिशेने जात असता समोरुन निपाणीच्या दिशेने जाणाऱ्या बोलेरो वाहनांचा टायर फुटल्याने वाहकांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी सरळ दुचाकीवर थडकल्याने जागीच दुचाकीस्वार ठार झाला. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून पुढील तपास करीत आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!