क्रीडाताज्या घडामोडीनिपाणी परिसर

निपाणी मराठा मंडळात क्रीडा स्पर्धांचे आयोजन उत्साहात!

2023 - 24 मधील वार्षिक क्रीडा स्पर्धा संस्थेचे अध्यक्ष उद्योजक रवींद्र कदम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न!

Kiran G.Patil Mo.No.8884357516

येथील मराठा मंडळ निपाणी संचलित मराठी विद्यानिकेतन प्राथमिक शाळा आणि निपाणी मराठा मंडळ हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने 2023 – 24 मधील वार्षिक क्रीडा स्पर्धा संस्थेचे अध्यक्ष उद्योजक रवींद्र कदम यांच्या अध्यक्षतेखाली संचालक बबन रामचंद्र चौगुले यांच्या हस्ते ध्वजारोहणाने संपन्न झाले. तर क्रीडा ज्योतीचे प्रज्वलन शिक्षण समितीचे चेअरमन राजेश कदम यांच्या हस्ते संपन्न झाले.

क्रीडा शिक्षक जय हिंद खपले यांनी स्पर्धकांना क्रीडा शपथ दिली. हॉलीबॉल क्रीडा प्रकाराचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन राजेश कदम यांनी केले.

यावेळी प्रथमेश जोशीलकर यांच्या नेतृत्वाखालील विभागीय पातळीवर प्रथम आलेल्या रिले संघाचा, तालुका पातळीवरील द्वितीय क्रमांकाच्या अब्दुल हदीच्या कप्तानपदा खालील क्रिकेट संघ आणि विभागीय पातळीवर लांब उडीत प्रथम क्रमांक पटकाविलेल्या माधवी देसाई आणि राष्ट्रीय पातळीवरील तायक्वांदो चॅम्पियन अमन अल्लाबक्ष सय्यद यांचा शील्ड, पदक आणि प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी उपस्थित मान्यवरां मध्ये बबन चौगुले, आय. टी. आय. चे प्राचार्य सचिन कुलकर्णी, प्राथमिक आणि माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक बाळासाहेब मोहिते आणि पी.एम. सुतार, सौ राजश्री आणि अल्लाबक्ष सय्यद, विशाल बुरुड, संजय साखळकर, विणा पत्की, शिल्पा कांबळे, प्राजक्ता पाटील याशिवाय अध्यापक बंधू – भगिनी आणि पालकांचा मोठा सहभाग होता.

प्रास्ताविक आणि स्वागत क्रीडा शिक्षक संजय पाटील यांनी केले. मान्यवरांचे गुलाब पुष्प, देऊन मुख्याध्यापक पी.एम. सुतार यांनी स्वागत केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल यादव यांनी केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!