क्रीडाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विद्यापीठ स्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धेमध्ये देवचंद महाविद्यालयाची विद्यार्थिनी लक्ष्मी जाधव प्रथम!

स्पर्धा जिल्हास्तर आणि विद्यापीठ स्तर अशा दोन भागांमध्ये घेण्यात आल्या!

Kiran G.Patil M.No.8884357516

शिवाजी विद्यापीठा मार्फत घेण्यात आलेल्या अविष्कार संशोधन स्पर्धेमध्ये विज्ञान विभागामधून कु. लक्ष्मी सुरेश जाधव तृतीय वर्ष वनस्पतीशास्त्र विभागामध्ये शिकणारी विद्यार्थिनी प्रथम आली.

सदर स्पर्धा जिल्हास्तर आणि विद्यापीठ स्तर अशा दोन भागांमध्ये घेण्यात आल्या जिल्हास्तरावरील स्पर्धा विवेकानंद कॉलेज कोल्हापूर येथे पार पडल्या त्या स्पर्धेत लक्ष्मी हिचा द्वितीय क्रमांक आला. त्यानंतर तिची निवड विद्यापीठ स्तरावर झाली त्यामध्ये तिचा प्रथम क्रमांक आला तिने युज ऑफ मोरिंगा ओईल फोर प्रेपरेशन ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ हर्बल सोप या विषयावर संशोधन पेपर सादर केला. सदर संशोधनासाठी तिला प्रा. डॉ. वर्षा खुडे यांनी मार्गदर्शन केले. तिची निवड आता मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे.

त्यांना संस्थेचे अध्यक्ष आशिषभाई शाह, उपाध्यक्ष तृप्ती भाभी शहा, संस्थेचे खनिजदार सुबोध भाई प्राचार्य.डॉ. जी. डी. इंगळे उपप्राचार्य डॉ. पी.पी. शहा अविष्कार कमिटीचे सदस्य यांचे मार्गदर्शन लाभले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!