क्रीडाताज्या घडामोडीमहाराष्ट्र
देवचंद महाविद्यालयाच्या व्हॉलीबॉल खेळाडूंची पश्चिम विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड!
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे स्पर्धेचे आयोजन!
देवचंद महाविद्यालयाचे व्हॉलीबॉल खेळाडू श्री. पवन पाटील व श्री. गजानन शिंगाडी यांची शिवाजी विद्यापीठ संघातून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड. येथे होणाऱ्या पश्चिम विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
विजयी खेळाडूंना जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा.आशिष शाह, उपाध्यक्ष डॉ.सौ. तृप्तीभाभी शाह, खजिनदार मा. सुबोधभाई शाह यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सौ.जी.डी. इंगळे, उपप्राचार्य डॉ.पी.पी. शाह जिमखाना प्रमुख डॉ. रवींद्र चव्हाण, प्रा. निरंजन जाधव डॉ.भालचंद्र आजरेकर जिमखाना कर्मचारी श्री. अनंत घोळवे, श्री. संतोष वागळे व श्री. वैभव सोनार यांचे मार्गदर्शन लाभले. विजयी खेळाडूंचं महाविद्यालयातील सर्व घटकां मार्फत अभिनंदन होत आहे.