क्राईमताज्या घडामोडीनिपाणी परिसरराजकीय

निपाणी शहर पोलिसांनी धडक कारवाई करत 11 जणांना घेतले ताब्यात!

भर वस्तीत हाय प्रोफाईल जुगार चालत असल्यामुळे पोलिसांच्या समोर देखील आव्हान!

Kiran G.Patil M.No.8884357516

पोलिसांना नेहमीच गुंगारा देत गेले अनेक दिवस चालत असलेल्या भर वस्तीतील जुगार अड्ड्यावर छापा टाकून निपाणी शहर पोलीस अधिकाऱ्यांनी उच्चभ्रू 11 जुगार्याना अटक करून “हम भी कुछ कम नही” चा नारा दिला आहे.

निपाणी येथील साखरवाडी व अशोक नगर परिसरा नजीक असलेल्या व निपाणीतील सर्वांच्या परिचयाचा असलेला परमणे बोळ येथे एका घरामध्ये जुगार खेळणाऱ्या बड्या आसामींवर निपाणी शहर पोलिसांनी धडक कारवाई केली. यात 11 जणांवर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी घटना घडल्याने या परिसरातील नागरिक अचंबित झाले असून आपल्या आसपास अशा घटना देखील घडतात याचे आश्चर्य देखील व्यक्त केले.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, साखरवाडी अशोकनगर परिसरा नजीक असलेल्या परमणे बोळ येथील इमारतीत गेल्या अनेक दिवसांपासून जुगार खेळला जात होता. रविवारी रात्रीही काही जण जुगार खेळत असल्याची माहिती निपाणी शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर रविवारी रात्री 10 वाजता निपाणी शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक उमादेवी गौडा व त्यांचे सहकारी राजू दिवटे एस. आर. माळगे, सुदर्शन असकी, मंजुनाथ कल्याणी, बी. जे. तळवार, सलीम मुल्ला, रमेश नाईक, बी. एस. नेरले, आर. एस. लोहार यांनी मिळून अचानक छापा टाकला. येथे जुगार खेळत असलेल्या 11 जणांना रंगेहाथ पकडले. या कारवाईत  3460 रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. या घटनेची नोंद निपाणी शहर पोलीस स्थानकात झाली आहे.

————————————————————————–

राजकारणात शत्रू, जुगारात मित्र….

पोलिसांनी छापा टाकून ज्या अकरा उच्चभ्रू लोकांना ताब्यात घेतले त्यातील अनेक जण राजकारणात सक्रिय असून विशेष म्हणजे राजकारणात एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणारे आहेत. तेच जुगार खेळण्यासाठी एकत्र आले होते. त्यामुळे राजकारणात जरी शत्रू असले तरी जुगारात मांडीला मांडी लावून जुगार खेळण्यात व्यस्त असताना पोलिसांनी पकडल्यानंतर कारवाईतून सुटका करून घेण्यासाठी तात्काळ आपापल्या नेते मंडळींना संपर्क करण्यात सरसावलेले  होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!