ताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्र

निपाणीत श्रीरामलल्ला मंदिर अयोध्या (Ayodhya ) येथील अक्षता कलश शोभायात्रा

शोभायात्रा बुधवार दि. २०/१२/२०२३ रोजी सायं. ५ वा निपाणी श्रीराम मंदिर येथून सुरू होईल.

किरण गोपाळराव पाटील मो.8884357516

अयोध्येतील शेकडो वर्षांच्या संघर्षानंतर निर्माण होत असलेल्या संपूर्ण भारतीयांच्या श्रद्धेचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक असलेल्या श्री रामलल्ला मंदिरातून निपाणी येथे अक्षता आलेल्या आहेत. बुधवार दिनांक 20/12/2023 रोजी सायं. 5 वा निपाणी श्रीराम मंदिर येथून सुरू होईल. या अक्षतांच्या कलशांची भव्य शोभायात्रा संपन्न होत आहे. शोभायात्रेत विविध संप्रदाय, संघटना, मंडळांचा सहभाग निश्चित झालेला आहे. यात्रा मार्गात रांगोळ्या काढून, पुष्पवृष्टी व भगवे ध्वज फडकावून नागरिक स्वागत करणार आहेत. शोभा यात्रेनंतर हे कलश परिसरातील पूर्वनियोजित ठिकाणी पाठविण्यात येणार असून त्यातील अक्षता दिनांक 1 ते 15 जानेवारी या कालावधीत घरोघरी पोहोचणार आहेत.

 22 जानेवारी 2024 या दिवशी अयोध्येत होणाऱ्या श्रीरामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या दिवशी प्रत्येकाने आसपासच्या मंदिरात या अक्षता घेऊन धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हायचे आहे. सदर कार्यक्रमाचे नियोजन विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने केले असून परिसरातील संत सज्जनांचे आशीर्वाद व मार्गदर्शन लाभले आहे.

श्री रामलला मंदिर अक्षता कलश शोभायात्रा मार्ग…

श्रीराम मंदिर, जूना पीबी रोड निपाणी – धर्मवीर छत्रपती संभाजी राजे सर्कल – निपाणी मेडिकल – चन्नम्मा सर्कल – कोठीवाले कॉर्नर – महादेव मंदिर – म. गांधी चौक – कोठीवाले कॉर्नर – नरवीर तानाजी चौक – छत्रपती शिवाजी महाराज चौक – बेळगाव नाका – श्रीराम मंदिर.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!