देवचंद कॉलेज येथील स्वयंसिध्दा सचेतना फोरम मार्फत लिंगभेद निर्मुलन जाणीव जागृती कार्यक्रम संपन्न!
राज्यघटनेतील स्त्री-पुरुष समानता या अनुषंगाने असलेल्या कायद्याची माहिती दिली!
देवचंद कॉलेज अर्जुननगर येथील स्वयंसिध्दा सचेतना फोरम मार्फत लिंगभेद निर्मुलन जाणीव जागृती हा कार्यक्रम दी.-21/12/2023, गुरुवारी घेण्यात आला.
डॉ.आनंदी कांबळे यांचे “लिंगभेद निर्मुलन जाणीव जागृती” या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. यावेळी डॉ.आनंदी कांबळे यांनी स्त्री- पुरुष भेदाच्या निर्मितीचा इतिहास मांडून आढावा घेतला. पाश्चात्य विचारवंताचा स्त्री – पुरुष समानतेचा तसेच भारतातील समाज सुधारकांचे लिंग समानते विषयाचे विचार आणि कार्य स्पष्ट केले. राज्यघटनेतील स्त्री-पुरुष समानता या अनुषंगाने असलेल्या कायद्याची माहिती दिली व ही समानता आपल्या कुटुंबापासून सुरु करण्याचे आव्हान केले. कुटुंबातून समाजापर्यंत ही समानता प्रस्तापित झाल्यानंतर देशातील 50%. नारी शक्तीचा वापर विकास प्रक्रियेत केला जाईल व भारताचे महासत्ता बनण्याचे स्वप्न साकार होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमासाठी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिषभाई शाह, उपाध्यक्षा डॉ.सौ. तृप्तीभाभी शाह, खजिनदार सुबोधभाई शाह, प्राचार्या प्रो. डॉ. जी. डी. इंगळे, उपप्राचार्य, प्रो. डॉ. पी. पी. शाह यांचे प्रोत्साहन लाभले. कार्यक्रमाची प्रस्तावना व पाहुण्यांचा परिचय डॉ. सुषमा जाधव- लिमकर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार डॉ. सुजाता पाटील यांनी मानले.