ताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्र

(Rankala Talav) (Ranjaka Tower) “मी रंकाळा बोलतोय” रंकाळ्याची एक आर्त हाक!

दरवर्षी विविध कार्यक्रमाद्वारे 25 डिसेंबर रंकाळा दिवस (कृतज्ञता दिन) आपण साजरा करतो!

Kiran G.Patil M.No.8884357516


दरवर्षी प्रमाणे विविध कार्यक्रमाद्वारे सोमवार 25 डिसेंबर रंकाळा दिवस  (कृतज्ञता दिन) रंकाळा पदपथ उद्यान स्टेज जवळ आपण साजरा होत आहे. यावर्षी रंकाळा तलाव उद्यान व परिसरात वेगवेगळ्या निधीतून कोट्यावधी रुपयाची विकास कामे मंजूर झालीत. त्यापैकी काही कामे पूर्ण झालेली आहेत. त्या झालेल्या कामा संदर्भात तसेच उर्वरित निधीतून होणारी काही कामे त्याबाबत आपल्या सूचना तसेच मार्गदर्शन या संदर्भात आपली मते मांडण्यासाठी, एक अभिनव उपक्रम रंकाळा संवर्धन व संरक्षण समितीने घेतला आहे.

रंकाळा संरक्षण समितीतर्फे आपल्याला एक पोस्ट कार्ड देण्यात येईल. रंकाळा पर्यावरण पूरक राहावा. रंकाळा उद्यान परिसरातील जैवविविधता, विविध रंगाची झाडे झुडपे ,वृक्ष संपदा, पक्षी, तलावातील जलचर प्राणी, मासे इत्यादींच संरक्षण होणं आणि संवर्धन होणे पर्यावरण वादी दृष्टिकोनातून फार महत्त्वाचे आहे. आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतो त्याच पद्धतीने रंकाळ्याचे पर्यावरण व पाणी सभोवतालचा परिसर आपण प्रदूषित होऊ नये. या हेतूने रंकाळा संवर्धन समिती गेली 15 ते 20 वर्षे सातत्याने काम करत आहे. समितीच्या कामाचं मूल्यमापन केले तर कार्यकर्ता या पातळीवर रंकाळ्याचे पर्यावरण जपण्यासाठी प्रामाणिकपणे काम प्रत्येक रंकाळा प्रेमींनी केले आहे. पर्यावरण पूरक किंवा रंकाळ्याचे वैभव वाचवण्यासाठी गेली तीस वर्षे सातत्याने समिती प्रयत्न करत आहे. यावर्षीही आपणास दिलेल्या पोस्ट कार्डद्वारे कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांना आपल्या विशेष सूचना व आपली मते मांडून रंकाळ्यासाठी आपण एक जागरूक नागरिक आहोत ही कर्तव्यदक्ष भूमिका घ्यावयाची आहे. या उद्देशाने हा उपक्रम राबवत आहोत. तरी आपण या उपक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!