आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विजयराज अशोक कोळी यांना साहित्यिक विभागा मधून डॉक्टरेट पदवी प्रधान!

अशिया इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी कडून त्यांना डॉक्टरेट पदवी देऊन बेंगलोर येथे गौरविण्यात आले.

Kiran G.Patil M.No.8884357516


घरची परिस्थिती बिकट असताना देखील शिक्षणाची जिद्द नाही सोडली. पार्ट टाइम जॉब करत करत त्यांनी शिक्षण पूर्ण केले. त्यांनी बारावी सायन्स शाखेतून उत्तीर्ण होऊन पुढे त्यांनी सिव्हिल इंजिनीरिंगचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर हायवे इंजिनिअर म्हणून जॉब करत-करत बी ए पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. लिखाण व वाचन याची आवड असल्यामुळे  पुढे एम ए मराठी विषयांतून पदवीधर झाले. पोस्ट ग्रॅज्युएशन  मध्ये जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर मध्ये त्यांनी डिस्टिंक्शन मध्ये एक फर्स्ट क्लास मिळवला. कॉलेज जीवना मध्येच त्यांनी वक्तृत्व तसेच निबंध स्पर्धेत प्रावीण्य मिळवत नंबर पटकावला होता.  महात्मा गांधी विचार संस्कार परीक्षे मधून कोल्हापूर जिल्ह्या मधून त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला. महात्मा गांधी यांचे पनतू श्री तुषार गांधी यांचे कडून गौरवण्यात आले.गोल्ड मेडल मिळाले. कॉलेज जीवनामध्ये एक खेळाडू म्हणून देखील रनिंग, कबड्डी, लॉंग जंप आणि गायन क्षेत्रात देखील  अनेक बक्षीसे मिळवली.

उत्कृष्ट लेखक म्हणून त्यांना पुणे येथे न्यायाधिश एन एस कुलकर्णी  यांचे कडून मेडल व पारितोषिक मिळाले आहे. सध्या ते शिवाजी युनिव्हर्सिटी मध्ये पी जी डिप्लोमा इन ऑनलाइन जर्नालिझम या पत्रकारितेच्या विशेष विभागातील शिक्षण घेत आहेत.

आशिया इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी कडून त्यांना डॉक्टरेट पदवी देऊन बेंगलोर येथे गौरविण्यात आले. शिरोळ तालुक्यामधील आमदार, खासदार, वरिष्ठ नेतेमंडळी यांचेकडून त्यांना शुभेच्छाचा वर्षाव व कौतुक होत आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!