कृषीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अथणी शुगर, भुदरगडची 15 डिसेंबर पर्यतची ऊस बिले जमा

कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर श्रीनिवास पाटील यांनी दिली.

Kiran G.Patil M.No.8884357516


अथणी शुगर लि.भुदरगड युनिटची सन 2023-24 हंगामातील 1 डिसेंबर ते 15 डिसेंबर पर्यंतची ऊस बिले विनाकपात एकरक्कमी प्रति मे.टन 3200 /- प्रमाणे संबंधित ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली. व 1 डिसेंबर ते 15 डिसेंबर पर्यंतची तोडणी वाहतुकीची बिले सुद्धा जमा केलेची माहिती कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री श्रीनिवास पाटील यांनी दिली.

तसेच सन 2023-24 सालात ज्या शेतकऱ्यांनी ऊस गाळपासाठी पाठवला आहे त्यांना प्रति टन 3100/- प्रमाणे ऊस बिल मिळाले आहे. त्यांचे उर्वरित प्रति टन 100/- रु.प्रमाणे संबंधित शेतकऱ्याच्या बँक खात्यावर जमा केले आहेत.

यावर्षीचा गळीत हंगाम उत्तमरित्या सुरू असून त्यासाठी कारखान्याने योग्य नियोजन केले असल्याने सध्या कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू आहे. त्यामुळे 44 दिवसात 1,19,532 मे. टन गाळप झाले असून सरासरी 10.65 रिकव्हरीने 1,23,705 क्विंटल इतकी साखर उत्पादित झाली आहे.

बाजारपेठे मध्ये साखरेच्या भावात चढ-उतार होत असला तरी आपल्या व्यवस्थापनाने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून, शेजारच्या कारखान्याच्या आसपास तसेच सर्वात अगोदर दर पंधरवड्याची ऊस बिले देऊन शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला आहे.तसेच,या पुढे सुद्धा दर पंधरवड्याची ऊस बीले वेळेवर ऊस उत्पादकांच्या नावावर जमा केली जातील. तरी सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पिकवलेला सर्व ऊस आमच्या कारखान्याला गाळपास पाठवून सहकार्य करावे असे आवाहन मॅनेजिंग डायरेक्टर  श्रीनिवास पाटील यांनी केले.

यावेळी चीफ इंजिनियर सुरेश शिंगटे, डे.चीफ केमिस्ट प्रकाश हेदु्रे, शेती अधिकारी राजाराम आमते.कार्यालयीन अधिक्षक बाबासाहेब देसाई,डे.चि अंकौटट जमिर मकानदार, शेतकरी व तोडणी वाहतूक कत्राटदार व सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!