ताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरसंपादकीय

निपाणीत विविध कार्यक्रमांनी ख्रिस्ती बांधवांनी साजरा केला ख्रिसमस सन!

अनेक ठिकाणी सांताक्लॉज कडून मिळालेला खाऊ वाटप!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी येथील मध्यवर्ती बस स्थानकाच्या काही अंतरावर असलेल्या कोल्हापूर वेसवर असलेल्या बागेवाडी कॉलेज समोरील चर्चमध्ये सोमवारी 25 डिसेंबर येशू ख्रिस्त जन्मोत्सव सोहळा पार पडला. त्यावेळी समाज बांधवांना रेव्ह. सुनील गायकवाड व एस. एस. सकट यांनी मार्गदर्शन केले.

सकाळी प्रारंभी सामूहिक प्रार्थना करून मेणबत्त्या प्रज्वलित करण्यात आल्या. त्यानंतर उपकार स्तुतीची प्रार्थना, स्तोत्र वाचन, शास्त्र वाचन, ख्रिस्त जन्माचे गीत, मध्यस्थीची प्रार्थना करण्यात आली. यावेळी दानार्पन, संदेश, सामूहिक गीत, प्रभूची प्रार्थना आणि आशीर्वचन झाले. तसेच नवीन वर्ष भक्ती कार्यक्रम पार पडला. यावेळी सचिन हेगडे, रमेश हेगडे, अनिल हेगडे, रमेश सकट, संजय हेगडे, संदेश सुतार, दीपक सकट, योगेश आवळे, अविनाश हेगडे, किसन दावणे, मायकल आवळे, सचिन आवळे, मोशे सकट, अतुल सकट, समीर हेगडे यांच्यासह महिला व ख्रिस्त समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

येशू ख्रिस्ताचा जन्म, मृत्यू, व दृष्टिकोन या विषयी थोडेसे….

येशू ख्रिस्ताचा जन्म नक्की कोणत्या दिवशी किंवा कोणत्या महिन्यात झाला, हे इतिहासात कुठेच नमूद केलेले नाही. तरी नवीन करारातील लूककृत शुभवर्तमान ह्या पुस्तकात यहुदी कॅलेंडर प्रमाणे सहाव्या महिन्यात (सध्याच्या कॅलेंडर प्रमाणे ऑगस्ट-सप्टेंबर) मरियेला देवदूताने तिच्या पोटी येशू जन्म घेणार असल्याचा देवाचा निरोप दिल्याची नोंद आहे. असे असले तरी, दर वर्षी २५ डिसेंबर हा ख्रिस्ताचा जन्मदिवस नाताळ म्हणून पाळला जातो. येशूचा मृत्यू वयाच्या 30-33 वर्षाच्या सुमारास झाला आहे, असे बायबलमध्ये नमूद केले आहे. त्याला क्रूसावर खिळून ठार करण्यात आले. त्याच्या स्वतःच्या शिष्यांशिवाय आणि अनुयायांच्या व्यतिरिक्त, येशूच्या काळातील यहुद्यांनी सामान्यतः त्याला मशीहा म्हणून नाकारले, जसे की आजच्या मोठ्या बहुसंख्य यहुदी करतात. ख्रिस्ती धर्मशास्त्रज्ञ, सार्वभौमिक परिषद, सुधारक आणि इतरांनी शतकानुशतके येशूबद्दल विस्तृतपणे लिहिले आहे. ख्रिश्चन पंथ आणि मतभेदांची व्याख्या अनेकदा त्यांच्या येशूच्या वर्णनाद्वारे केली गेली आहे. दरम्यान, मॅनिचियन, नोस्टिक्स, मुस्लीम, द्रुझ, बाहाई धर्म आणि इतरांना त्यांच्या धर्मांमध्ये येशूसाठी प्रमुख स्थाने सापडली आहेत. ख्रिश्चन धर्म हा लोकसंखेच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा धर्म आहे. ख्रिस्ती धर्माला जवळ जवळ २००० वर्षांचा इतिहास आहे. या धर्माचा उगम पालेस्तीन येथे झाला. प्राचीन यहुदी धर्मातून ख्रिस्ती धर्माचा विकास होत गेला. येशू ख्रिस्त हा या धर्माचा प्रवर्तक मानला जातो. स्वतः येशू ख्रिस्त आणि त्याचे शिष्य हे धर्माने यहुदी होते. ख्रिस्ती शकारंभी बलाढ्य रोमन साम्राज्य अटलांटिक महासागरा पासून तुर्कस्तान पर्यंत व जर्मन समुद्रापासून सहारा पर्यंत पसरले होते. पालेस्तीन हा या रोमन साम्राज्यातील एक सुभा होता. योग्य वेळी जेरुसलेम शहराजवळच्या गालील प्रांतात, बेंथलेहम या गावी मरिया नावाच्या एका यहुदी कुमारीके पोटी ख्रिस्ताचा जन्म झाला. पुरुषाच्या संपर्का शिवाय पवित्र आत्माच्या द्वारे मरिया कुमारी असतानाच हा जन्म झाला. हा एक चमत्कारच होता. असा ख्रिस्ती धर्माचा विश्वास आहे. मरीयेचा वाग्दत्त पती योसेफ याने तिला आपली पत्नी म्हणून स्वीकारले. त्या काळी पालेस्तीनवर रोमन सत्ता होती. सम्राट औगुस्तुस हा रोमचा बादशहा होता व हेरोद राजा हा त्याचा मांडलिक राजा म्हणून गालील प्रांतावर राज्य करीत होता. ख्रिस्ताचा जन्म नक्की कधी झाला याची नक्की तारीख उपलब्ध नाही. परंतु अलीकडील संशोधनानुसार इसवी सन पूर्व ४ ते ६ या दरम्यान मार्च किवा एप्रिल महिन्यात त्याचा जन्म झाला असावा असा कयास आहे. आज जो ख्रिस्ती शक आपण वापरतो त्याची सुरुवात ख्रिस्ताच्या जन्मापासून झालेली आहे. वयाच्या तिसाव्या वर्षापर्यंत तो सुताराचे कार्य करीत होता. मग शाश्वत स्वर्गीय राज्य येणार असल्याची शिकवण देण्यास त्याने सुरुवात केली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!