ताज्या घडामोडीनिपाणी परिसरमहाराष्ट्र

देवचंद मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP 2020) या विषया वरती कार्यशाळा संपन्न!

गुणवत्ता हमी कक्षाने NEP 2020: Transformation in Higher Education या विषयावरती एकदिवसीय परोसंवाद

Kiran G.Patil M.No.8884357516


राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 अमंलबजावणी करिता व त्यातील धोरणांचा अभ्यास व त्याबद्दलची सखोल अशी माहिती शैक्षणिक संस्थामधील अनेक घटकांना माहिती होण्यासाठी या संस्थेचे  आशिषभाई शाह,(अध्यक्ष, जनता शिक्षण मंडळ,अर्जुननगर ), डॉ सौ. तृप्तीभाभी शाह, (उपाध्यक्षा, जनता शिक्षण मंडळ, अर्जुननगर ) यांच्या कल्पनेतून देवचंद महाविद्यालय व परीसरातील अनेक महाविद्यालयाच्या घटकांना याची सखोल माहिती मिळावी म्हणून देवचंद महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाने NEP 2020: Transformation in Higher Education या विषयावरती एकदिवसीय परिसंवाद शुक्रवार दिनांक 29 डिसेंबर रोजी आयोजित केला होता.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ प्रकाश कोपार्डे, केंद्रीय हैद्राबाद विद्यापीठ, हैद्राबाद हे होते. कार्यक्रमाचे उद्घाटन तुळशीस जल अर्पण करून केले.त्यांच्या व्याख्याना मध्ये NEP 2020 मधील सर्व मुद्यावरील संपूर्ण माहिती अत्यंत साध्या व सोप्या भाषेत सांगितले, त्यानी शैक्षणिक संस्थेमधील सर्वच घटकांना NEP 2020 बद्दल जागरूक असणे आवश्यक आहे असे सांगितले. शैक्षणिक पद्धतीमध्ये आमुलाग्र बदल होणार असून त्यासाठी सर्वच घटकांनी सक्षमपणे तयार होणे आवश्यक आहे. भारतीय ज्ञान प्रणालीच्या उपयोग करून जागतिक दर्जाचे शिक्षण देणे हे NEP 2020 चे उद्देश आहे असे नमूद केले.

दुसऱ्या सत्राचे प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून  डॉ महेश शिंदिकर, अधिव्याख्याता, COEP टेक्नॉलॉजीकल युनिव्हसिटी, पुणे हे उपस्थित होते. त्यानी आपल्या मार्गदर्शनामध्ये महाविद्यालयातील भौतिक सुविधा, शिक्षकांचे कौशल्य या विषयावरती मार्गदर्शन केले. शिक्षकांनी स्वतःला सक्षम बनवणे, स्वतः विविध कौशल्य आत्मासात करून विद्यार्थ्यांना ते चांगल्या पद्धतीने पोहचवणे गरजेचे आहे असे म्हणले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवचंद महाविद्यालयाच्या प्राचार्या, प्रो. डॉ जी. डी. इंगळे होत्या. त्यांनी हा सेमिनार घेण्यामागे असलेला उद्देश स्पष्ट करून या कार्यक्रमाचा लाभ आपल्या व परीसरातील महाविद्यालयाच्या शिक्षकांनी घ्यावा असे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ पी. डी. शिरगांवे यांनी केले व पाहुण्यांची ओळख सहसमन्वयक प्रा. बी. जी. पाटील यांनी केली तर प्रा. डॉ. एल. पी. लंका व डॉ एस. डी. पाटील यानी आभार मानले. सदर कार्यक्रमास उपप्राचार्य प्रो.डॉ. पी.पी. शाह, प्रा. डॉ श्रीधर गोखले तसेच अनेक महाविद्यालयामधून आलेले प्राचार्य ,अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक, प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. ज्योती बुवा यानी कार्यक्रमाचे सुत्र संचालन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. डॉ आनंद गाडीवड्ड, प्रा. प्रविणसिंह शिलेदार, प्रा. अजित गुरव, डॉ अमोल नारे, डॉ. संतोष यादव, डॉ आर. जी. चव्हाण, प्रा. किरण आबिटकर, प्रा.अमृता गोंधळी, प्रा. स्मीता पाटील, प्रा अस्मा बेग तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा सहयोग लाभला.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!