आपला जिल्हाताज्या घडामोडीनिपाणी परिसरशैक्षणिक

देवचंद महाविद्यालयात स्व. अनसूयाबेन देवचंदजी शाह यांच्या स्मृतिदिनानिमित आंतरराज्यीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न!

काल झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्र व कर्नाटक या ठिकाणाहून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला!

Kiran G.Patil M.No.8884357516


देवचंद महाविद्यालय अर्जुननगर येथे मा.स्वर्गीय अनसूयाबेन देवचंदजी शाह यांच्या स्मृतिदिनानिमित्त (03 जानेवारी) स्व.अनसूयाबेन देवचंदजी शाह आंतरराज्यीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाल्या. यामध्ये महाराष्ट्र व कर्नाटक या ठिकाणाहून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

ही स्पर्धा बुधवार दिनांक 03 जानेवारी 2024 रोजी घेण्यात आली .पूर्वतयारी स्पर्धेतील विषय पुढील प्रमाणे होते :1.भारताने रचला इतिहास- चांद्रयान-3 मोहीम झाली खास.2. जल हेच जीवन .3.अरे युवका जागा हो ,विकासाचा धागा हो .4.स्त्री शक्तीचा नारा केवळ शब्दातच फुलतो ‘भारत की बेटी’ चा मोहोर मणिपूरमध्ये जळतो.5.समाज माध्यमांच्या विळख्यात तरुणाई: राष्ट्रीय विकासाची आहे सर्वांनाच घाई.

निकाल- पूर्वतयारी स्पर्धा

प्रथम क्रमांक – प्रज्ञा श्रीकांत माळकर ( सांगली)- प्रमाणपत्र व कायमस्वरूपी ट्रॉफी, द्वितीय क्रमांक कार्तिका संजय पाटील ( निपाणी) तसेच तृतीय क्रमांक- संकेत कृष्णात पाटील( गडहिंग्लज)

निकाल:- उत्स्फूर्त स्पर्धा 

प्रथम क्रमांक प्रज्ञा श्रीकांत माळकर ( सांगली)-प्रमाणपत्र व कायमस्वरूपी ट्रॉफी, द्वितीय क्रमांक- संकेत कृष्णात पाटील( गडहिंग्लज) तृतीय क्रमांक- अमृता पांडुरंग सागर सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले .या स्पर्धेचे उद्घाटन मा स्व. अनसूयाबेन देवचंदजी शाह यांच्या प्रतिमेचे पूजन करून व दीपप्रज्वलनाने मान्यवरांच्या हस्ते झाले.

महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रो. डॉ. जी डी. इंगळे ,परीक्षक डॉ अर्जुन जाधव,परीक्षक प्रा.नानासाहेब जामदार व परीक्षक डॉ आशालता खोत, स्पर्धा विभाग डॉ.अनिता चिखलीकर तसेच पत्रकार किरण पाटील आदी उपस्थित होते.

दरम्यान स्वर्गीय पद्मभूषण देवचंदजी शाह वक्तृत्व स्पर्धा 01 जानेवारी 2024 रोजी महाविद्यालय अंतर्गत स्पर्धा संपन्न झाल्या. त्याचा निकाल-

उत्स्फूर्त स्पर्धेतील निकाल खालील प्रमाणे.

प्रथम क्रमांक- तानिया किल्लेदार द्वितीय क्रमांक -पूर्वा कुंभार व तृतीय क्रमांक समर्थ माळी व सह्याद्री कमळकर .

पूर्वतयारी स्पर्धेतील निकाल खालील प्रमाणे

प्रथम क्रमांक – प्रणय दवडते ,द्वितीय-सह्याद्री कमळकर ,तृतीय -आरती सुरवसे व उत्तेजनार्थ तानिया किल्लेदार व तृप्ती निकम. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रा.राजकुमार कुंभार, डॉ. विजय गायकवाड व डॉ.आनंद गाडीवड्ड यांनी काम पाहिले.

पारितोषिक वितरण प्रसंगी व्हाईट आर्मीचे संस्थापक श्री अशोक रोकडे उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते स्पर्धकांना पारितोषिक वितरण करण्यात आले. पर्यवेक्षक डॉ. अशोक डोनर, आयक्यूएसी चे समन्वयक प्रा. बी जी पाटील, प्रा .विनायक कुंभार , प्रा रमेश कुंभार , कार्यालयीन अधीक्षक दत्तात्रय पाटील , शिवाजी जाधव, प्रा आसमा बेग, प्रा. वर्षा पाटील,  दिगंबर कुंभार यांचे विशेष सहकार्य लाभले. तर कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष आशिषभाई शाह, उपाध्यक्षा डॉ सौ. तृप्तीभाभी शाह तसेच संस्थेचे खजिनदार सुबोधभाई शाह उपप्राचार्य प्रो.डॉ. पी.पी. शाह यांचे प्रोत्साहन लाभले. प्रा कृष्णामाई कुंभार तसेच व्हाईट आर्मीचे कार्यवाह प्रशांत शेंडे यासह विद्यार्थी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ प्रवीणसिंह शिलेदार यांनी केले तर स्पर्धेची नियम व अटींचे वाचन प्रा. विष्णू पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सदानंद झळके यांनी केले. कार्यक्रमाचे आभार वकृत्व स्पर्धा समिती विभाग प्रमुख डॉ.अनिता चिखलीकर यांनी मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!