आपला जिल्हागुन्हाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरशैक्षणिक

देवचंद महाविद्यालयात “सायबर सुरक्षा व जागरूकता” या विषयावर कार्यशाळेचे आयोजन!

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी निपाणी आणि निपाणी परिसरातील अनेक शाळांना भेट देऊन हा उपक्रम यशस्वीरीत्या राबविला आहे

Kiran G.Patil M.No.8884357516


देवचंद कॉलेज अर्जुननगर येथे “सायबर सुरक्षा व जागरूकता” हा उपक्रम गेले तीन आठवडे चालू आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी निपाणी आणि निपाणी परिसरातील अनेक शाळांना भेट देऊन हा उपक्रम यशस्वीरीत्या राबविला आहे. दिनांक 29/12/2023 रोजी वार्षिक स्नेहसंमेलनाचे औचित्य साधून ‘सायबर सुरक्षा व जागरूकता’ या विषयावर श्री. जी. एम. संकपाळ हायस्कुल, श्रीपेवाडी येथे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनात उपस्थित 1000 पेक्षा अधिक मुले व पालकांना सायबर सुरक्षेविषयी माहिती दिली.

कार्यक्रमाप्रसंगी बोलताना प्रा. प्रशांत कुंभार म्हणाले सुरक्षा जागरूकता या उपक्रमातंर्गत ऑनलाईन पद्धतीने होणारी फसवणूक रोखण्यासाठी घ्यावयाची काळजी आणि फसवणूक झाल्यास त्याची तक्रार कशी व कोठे करावी याबद्दल विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. तर निकिता पांढरपोटे, ओंकार स्वामी आणि स्नेहल कुंभार या विद्यार्थ्यांनी सायबर सेफ कसे राहता येते, आपले पासवर्डस कसे सुरक्षित ठेवता येतात व सायबर सेफ राहण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची दक्षता घ्यावी याबद्दल माहिती दिली. श्री. जी. एम. संकपाळ हायस्कुलचे मुख्याध्यापक श्री. जे. एस. जाधव यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बी. एच. पाटील यांनी केले. विद्यार्थी समन्वयक कु. हर्षवर्धन जबडे याने सायबर सुरक्षा शपथ दिली व कार्यक्रमाचे आभार मानले. सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष आशिषभाई शाह व महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रो.डॉ. जी. डी. इंगळे व प्रो. डॉ. पी. पी. शाह याचे मार्गदर्शन लाभले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!