क्रीडाताज्या घडामोडीनिपाणी परिसरमहाराष्ट्र

विभागीय क्रिकेट स्पर्धेत देवचंद, नाईट कॉलेज, डी.के.ए.सी. इचल, गोखले कॉलेज विजयी!

देवचंद कॉलेजच्या संघाने वारणानगर संघाचा 8 विकेट राखून पराभव करून पुढील फेरीत प्रवेश केला!

Kiran G.Patil M.No.8884357516


देवचंद कॉलेज येथे दि.६/१/२०२३ रोजी झालेल्या पहिल्या सामन्यात यजमान देवचंद कॉलेजच्या संघाने तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालय वारणानगर या संघाचा ८ विकेट राखून पराभव करून पुढील फेरीत प्रवेश केला. वारणा नगर संघाने प्रथम फलंदाजी करताना 93 धावा केल्या तर धावांचा पाटलाग करताना देवचंद कडून श्रेयश मातीवड्डर याने 25 धावा केल्या तर प्रथमेश बांदिवडेकर याने नाबाद 48 धावा केल्या, तर दुस-या सामन्यात नाईट कॉलेज कोल्हापूर संघाने सदाशिवराव मडलिक महाविद्यालय मुरगूड या संघाचा 118 धावांनी पराभव करून पुढील फेरीत प्रवेश केला. प्रथम फलंदाजी करताना नाईट कॉलेज कोल्हापूर 195 धावा केल्या तर मुरगूड संघाने सर्व बाद 77 धावा केल्या.

दरम्यान वारणानगर येथे झालेल्या पहिल्या सामन्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज पेठवडगाव हा संघ वेळेत उपस्थित नसल्याने गोपाल कृष्ण गोखले महाविद्यालयाच्या संघास पुढे चाल देणेत आली. तर दुस-या सामन्यात डी.के.ए.एस.सी. कॉलेज संघाने प्रो. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालय संघाचा 5 विकेट राखून पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला. वारणा नगर येथील सर्व सामने प्रा. बकस कुरणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरळीत पार पडत आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!