कृषीताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रशैक्षणिकसंपादकीय

देवचंद महाविद्यालयांमध्ये स्पेक्ट्रॉसकॉपी आणि क्रोमॅटोग्राफि या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न!

या कार्यक्रमाचा लाभ 100 हून अधिक विद्यार्थी व प्राध्यापक संशोधकांना झाला!

Kiran G.Patil M.No.8884357516


देवचंद महाविद्यालया मधील कृषी रसायने व कीड व्यवस्थापन विभागामार्फत स्पेक्ट्रोस्कॉपी आणि क्रोमॅटोग्राफी या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर रविराज शिंदे, प्रॉडक्ट आणि फिल्ड अप्लिकेशन स्पेशालिस्ट एलसीएमएस स्पेक्ट्रोलिटिक सायंटिफिक इंडिया, पार्किन्स एल्मर, ठाणे हे उपस्थित होते.

उद्घाटन प्रसंगी बोलताना ते म्हणाले औद्योगिक व संशोधन क्षेत्रामध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब होत असून हे तंत्रज्ञान विद्यार्थी प्राध्यापक व संशोधकांना अवगत असणे गरजेचे आहे, त्यासाठी क्रोमॅटोग्राफी व स्पेक्ट्रोस्कॉपी या विषयावरती राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी आपले पदवीचे शिक्षण पूर्ण करत असताना अनेक प्रकारचे तांत्रिक कौशल्य आत्मसात करणे काळाची गरज आहे, जेणेकरून आपल्या महाविद्यालयाचे विद्यार्थी जागतिक स्पर्धेमध्ये टिकू शकतील.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी देवचंद कॉलेजच्या  प्राचार्य प्रा. डॉ जी. डि. इंगळे होत्या, अध्यक्षीय भाषणामध्ये त्या म्हणाल्या भारत हा कृषीप्रधान देश असून येणाऱ्या काळामध्ये कृषी व कृषी संबंधी अनेक उद्योगधंदे तयार होत आहेत. त्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांनी नवनवीन कौशल्य आत्मसात करून देशाचा उभारणीमध्ये हातभार लावावा तसेच माननीय पंतप्रधान यांच्या अवहाना नुसार विकसनशील ते विकसित राष्ट्र उभा करण्यासाठी युवकांचे योगदान अनमोल असणार आहे.

उद्घाटन प्रसंगी देवचंद महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक डॉ प्रशांत शाह, डॉ आनंद सावंत प्राध्यापक डॉ पी. डी. शिरगावे हे उपस्थित होते. सदर कार्यक्रम दोन सत्रा मध्ये पार पडला. पहिल्या सत्रामध्ये प्रमुख वक्ते म्हणून डॉ आनंद सावंत सहयोगी प्राध्यापक संजय घोडावत युनिव्हर्सिटी अतिग्रे यांनी स्पेक्ट्रोस्कोपी व त्याचे उपयोग या विषयावरती मार्गदर्शन केले.

या विषयावरती विद्यार्थ्यांना अत्यंत सुलभ भाषेमध्ये मार्गदर्शन केले तसेच त्यांनी काही प्रश्न देखील विद्यार्थ्यांकडून सोडवून घेतले. या सत्रा साठी चेअर पर्सन म्हणून डॉ अतुल कुमार कांबळे जी. आय. बागेवाडी कॉलेज निपाणी यांनी काम पाहिले.

पहिल्या सत्रातील दुसऱ्या व्याख्यानासाठी वक्ते म्हणून डॉ. रविराज शिंदे हे उपस्थित होते. त्यांनी आपल्या व्याख्याना मध्ये क्रोमॅटोग्राफी व त्याचे औद्योगिक क्षेत्रातील महत्त्व यावर मार्गदर्शन केले. या सत्रासाठी चेअर पर्सन म्हणून दत्ताजीराव कदम आर्ट सायन्स कॉमर्स कॉलेज इचलकरंजीचे डॉ. सुभाष इंगळे हे उपस्थित होते.

कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रामध्ये विद्यार्थ्यां साठी Atomic absorption spectroscopy, Flame photometer, High performance liquid chromatography, flash chromatography, Ultraviolet spcrophotometer व infrared spectroscopy अशा विविध उपकरणांच्या प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये तज्ञ शिक्षक म्हणून डॉ उस्मानगणी अत्तार, दहिवडी कॉलेज दहिवडी, डॉ सुजाता शिरगावे, बी. के. कॉलेज चिकोडी, डॉ वीरकुमार गोरवाडे, गव्हर्मेंट फर्स्ट ग्रेड कॉलेज, सदलगा, तसेच डॉक्टर अविनाश रामटेके, प्राध्यापक अजित गुरव व रवींद्र चौगुले यांनी काम पाहिले.

कार्यशाळेचा सांगता समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कृषी संशोधन केंद्र निपाणी येथील प्रिन्सिपल सायंटिस्ट डॉ. पी. एस. मतीवडे हे उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणामध्ये अशा प्रकारचे अनेक उपक्रम महाविद्यालयाने हाती घ्यावे व विद्यार्थ्यांच्या विकासामध्ये सिंहाचा वाटा उचलावा, तसेच विद्यार्थ्यांनी देखील या कार्यशाळेमध्ये सहभाग नोंदवून त्यांची बौद्धिक प्रगती करून जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवावा असे आव्हान केले. सदर प्रसंगी सर्व सहभागी विद्यार्थी व शिक्षकांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी रसायने व कीड व्यवस्थापन आदी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ पी .डी. शिरगावे यांनी केले. पाहुण्यांची ओळख प्राध्यापिका किरण अबिटकर व रविना जिरगे यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्राध्यापिका अमृता गोंधळी व दिपाली इंगवले यांनी केले. हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. आशिषभाई शाह, उपाध्यक्षा डॉ सौ तृप्तीभाभी शाह यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापिका डॉक्टर जी. डी. इंगळे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी दयानंद अनुसे, राजश्री वायदंडे, रणजीत कोळी, संतोष सुतार, विकास कोरे, अभिजीत साबळे यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचा लाभ 100 हून अधिक विद्यार्थी व प्राध्यापक संशोधकांना झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी नमीरा देसाई यांनी केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!