ताज्या घडामोडीनिपाणी परिसरराजकीय

श्री महात्मा बसवेश्वर हुन्नरगी शाखेचा 22 वा वर्धापन दिन सोहळा संपन्न!

वर्धापन दिनाचे औचित्य साधत रक्तदान शिबीराचे आयोजन!

Kiran G. Patil M.No.8884357516


“सहकारातून समृद्धीकडे” या ब्रीद वाक्यासह सहकारात मार्गक्रमण करणाऱ्या व 700 कोटींच्या ठेवीचे उद्दिष्ट गाठण्याच्या मार्गावर असणाऱ्या श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी नि; निपाणी शाखा हुन्नरगीची 22 वा वर्धापन दिन संपन्न झाला.

आपल्या सहकारीच्या हुन्नरगी शाखेचा 22 वा वर्धापन दिन सोहळा बुधवार दि. 10-1-2024 रोजी साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री बसवेश्वर प्रतिमा पुजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. वर्धापन दिनाचे औचित्य  साधून “रक्तदान शिबीर” सकाळी 10 वा. शाखा कार्यालयात आयोजित केले होते. एकूण 11 रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले.

कार्यक्रमास अध्यक्ष संचालक म्हणून महेश बागेवाडी व श्रीकांत परमणे यांची उपस्थिती होती. आपल्या मनोगत मध्ये बागेवाडी यांनी असे सांगितले की एवढ्या कमी अवधी मध्ये संस्थेने केलेली प्रगती डोळ्याची पारणे फेडणाऱी असून, मुख्य शाखेच्या संचालकांच्या मार्गदर्शनाखाली शाखा संचालकांनी देखील चांगले काम केले असून ते कौतुकास पात्र आहेत. तर संचालक परमणे यांनी आपल्या मनोगत मध्ये संस्थेचा एकंदरीत आर्थिक लेखाजोखा मांडला, निपाणी पासून बऱ्याच अंतरावर असणाऱ्या हुन्नरगी सारख्या चार साडेचार हजार च्या लोकवस्तीच्या गावामध्ये 9 कोटीपेक्षा जास्त ठेवी उपलब्ध होणे व 3 कोटी पेक्षा जास्त कर्ज वितरित करणे म्हणजे छोट्याशा रोपाचे वटवृक्षात रूपांतर झाल्यासारखे आहे,व यामध्ये प्रामुख्याने शाखा व्यवस्थापक, कर्मचारी व स्थानिक संचालकांची योगदान डोळ्यात भरण्या सारखे असून, मागील आर्थिक वर्ष मार्च 2023 मध्ये हुन्नरगी शाखेस तब्बल 1 कोटी 86 लाखाचा निव्वळ नफा झालेला असून, संस्थेची स्वतःची जागा असून त्या जागेवर स्वमालकीची इमारत देखील उभी करण्यात आली आहे. व याचे सर्व श्रेय सभासद व हितचिंतकांना देतो असे सांगितले.

यावेळी प्रधान शाखेचे डॉ. चंद्रकांत बी. कुरबेट्टी संस्थापक चेअरमन – चेअरमन श्री. सुरेश सी. शेट्टी व्हा. चेअरमन डॉ. शंकरगौडा आर. पाटील, श्री. किशोर ए. बाली श्री. प्रताप एस. पट्टणशेट्टी श्री. श्रीकांत बी. परमणे श्री. महेश व्ही. बागेवाडी श्री. अशोक एम. लिगाडे श्री. सदानंद ए. दुमाले श्री. प्रताप जे. मेत्राणी श्री. सदाशिव एन. धनगर श्री. दिनेश सी. पाटील सौ. पुष्पा सी. कुरबेट्टी श्रीमती विजया ए. शेट्टी श्री. शशिकांत के. आदण्णावर, सी.इ.ओ.सौ. सुवर्णा पी. पट्टणशेट्टी तसेच हुन्नरगी शाखा संचालक मंडळाचे श्री. सुदिप डी. मुरदंडे चेअरमन श्री. रामगोंडा ए. पाटील व्हा चेअरमन श्री. पायगोंडा बी. पाटील श्री. वसंत आर. शिंत्रे श्री. अशोक पी. मुरदंडे श्री. युसुफ एस. मुल्ला श्री. देवाप्पा डी. कांबळे सौ. शर्मिला ए. मुरदंडे

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक अशोक किल्लेदार यांनी केले तर सुत्रसंचालन व आभार श्री वंटे यांनी मानले

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!