ताज्या घडामोडीनिपाणी परिसरराजकीयशैक्षणिक

धनसंपत्तीच्या मृगजळापेक्षा, वास्तवातील आरोग्य संपत्ती महत्त्वाची!

सहकाररत्न चंद्रकांत कोठीवाले यांचे प्रतिपादन : निपाणी व्हीएसएम मध्ये आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद!

Kiran G.Patil M.No.8884357516


पूर्वीच्या काळी कोणाच्याही घरात आपण प्रवेश केल्यानंतर समोरच आपणास त्या घरातील तुळई (सध्याच्या भाषेतील आडवा बीम) दिसायची त्यावर नेहमीच प्रत्येक जण तीन म्हणी लिहीत असत त्या पुढील प्रमाणे असत “सर्प कुळास अस्तिक दुराई” “अपयश ही यशाची पहिली पायरी आहे” व सर्वात महत्त्वाची म्हण म्हणजे “आरोग्यम् धनसंपदा” होय. या तीन म्हणीचा उलगडा केल्यास आपणास शेवटच्या म्हणीचा अर्थ थोडा आजच्या काळी समजणं अतिशय गरजेचे झाले असून जर आपणास शारीरिक हालचाली करण्यास किंवा तत्सम अनेक गोष्टी करण्यास अडसर येत असेल तर आपली पेटीतील धनसंपदा कामास न येता आरोग्यम् धनसंपदा  चांगली असणे गरजेचे झाले आहे. आपला जन्मा जरी नैसर्गिक असला तरी आपला मृत्यू हा ठरलेला व अटळ असतो. 

पण आपण जन्म मृत्यूच्या मधल्या काळातील जीवन कसे जगतो याला फार महत्त्व असत. याचीच उणीव सर्वत्र भासत असून जो तो धनसंपत्तीच्या मागे लागून आरोग्य संपत्ती कडे अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे अनेक आजार आज चालून येत आहेत. यामुळेच अनेकवेळा विविध अशा आजारानी माणसाला ग्रासले जाते. आणि त्यावेळी आरोग्याचे महत्व लक्षात येते. पण त्यावेळी मागील वेळ गेलेली असते. अशावेळी आरोग्यावर मोठा खर्च करावा लागतो पण जर पहिल्यापासूनच आरोग्य हीत जोपासले पाहिजे. यासाठी नियमित व्यायाम योगासन प्राणायाम महत्त्वाचे आहेत. पण त्याचबरोबर आरोग्याच्या चाचण्या देखील करून घेणे हितार्थ ठरते. मानवी जीवनात धन संपत्तीच्या मृगजळा पेक्षा आरोग्य संपत्तीच महत्त्वाची व सर्वश्रेष्ठ आहे, असे प्रतिपादन व्हीएसएम संस्थेचे चेअरमन, सहकाररत्न चंद्रकांत कोठीवाले यांनी केले.

ते काल शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या येथील विद्यासंवर्धक मंडळाचा स्थापना दिवस विविध उपक्रमांनी साजरा केला जात आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून गुरुवारी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या आरोग्य शिबिरात सरकारी 2 तर खाजगी क्षेत्रात आरोग्यसेवा देणाऱ्या 16 डॉक्टरांनी आपले तपासणीसाठी योगदान दिले. तब्बल एक हजार हुन जास्त नागरिकांची  आरोग्य तपासणी केली. या सेवा बाबत डॉक्टरांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला, स्वागत आणि प्रास्ताविक संस्थेचे सीईओ डॉ. सिद्धू पाटील यांनी केले.

विद्यासंवर्धक मंडळाचा स्थापना दिवस औचित्य साधून चालू केलेल्या आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ परिसरातील नागरी महिला संस्थेचे सभासद यांच्यासह विद्यार्थ्यांनी घेतला. शिबिरात महात्मा गांधी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सीमा गुंजाळ, डॉ. गीता बागेवाडी, खासगी वैद्य ‘व्हीएसएमचे उपाध्यक्ष डॉ. अशोक पुजारी, डॉ. ईश्वर ढोले, डॉ. सनथ जमदाडे, डॉ. अमित होगाडे, डॉ. सचिन कल्लुर, डॉ. इंद्रजीत शिंदे, डॉ. विजय माळी, डॉ. स्नेहल माळी, डॉ. प्रमोद पाटील, डॉ. माधव कुलकर्णी, डॉ. हर्षल जाधव, डॉ. संदीप चिखले, डॉ अर्जुन जनवडे, डॉ. शिवानंद धुमाळे, डॉ प्रमोद निलेकर, डॉ. सुहास पाटील यांनी शिबिरात सहभागी होऊन तपासणी केली

यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन पप्पू पाटील, सेक्रेटरी हरिश्चंद्र शांडगे, संचालक चंद्रकांत तारळे, डॉ. अशोक पुजारी, अविनाश पाटील, भरत कुरबेट्टी, समीर बागेवाडी, शेखर पाटील, संजय मोळवाडे, सचिन हालपन्नावर, रावसाहेब पाटील, प्रवीण पाटील यांच्यासह मान्यवर विविध संघ संस्थांचे पदाधिकारी, नागरिक, महिला शिक्षक, विद्यार्थी मोठ्या उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!