कृषीताज्या घडामोडीनिपाणी परिसरमहाराष्ट्र

अथणी शुगर, भुदरगडची 31 डिसेंबर पर्यंतची ऊस बिले जमा!

एकूण हंगामातील 66 दिवसात 10.95 रिकव्हरीने 2,03,775 क्विंटल इतकी साखर उत्पादित झाली आहे!

Kiran G.Patil M.No.8884357516


वर्षातील पहिला सण मकर संक्रांतीचा गोडवा साधक अथणी शुगर लि.भुदरगड युनिटची सन 2023/24 हंगामातील 16 डिसेंबर ते 31 डिसेंबर पर्यंतची ऊस बिले विनाकपात एकरक्कमी प्रति मे.टन 3200 /- प्रमाणे संबंधित ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा.

तसेच 16 डिसेंबर ते 31 डिसेंबर पर्यंतची तोडणी वाहतुकीची बिले सुद्धा जमा केलेची माहिती कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर मा.श्री श्रीनिवास पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावर्षीचा गळीत हंगाम उत्तमरित्या सुरू असून त्यासाठी कारखान्याने योग्य नियोजन केले असल्याने सध्या कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू आहे त्यामुळे 66 दिवसात 1,90,170 मे. टन गाळप झाले असून सरासरी 10.95 रिकव्हरीने 2,03,775 क्विंटल इतकी साखर उत्पादित झाली आहे.

बाजारपेठेमध्ये साखरेच्या भावात चढ-उतार होत असला तरी आपल्या व्यवस्थापनाने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून, शेजारच्या कारखान्याच्या आसपास तसेच सर्वात अगोदर दर पंधरवड्याची ऊस बिले देऊन शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला आहे.तसेच या पुढे सुद्धा दर पंधरवड्याची ऊस बिले वेळेवर ऊस उत्पादकांच्या नावावर जमा केली जातील.तरी सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पिकवलेला सर्व ऊस आमच्या कारखान्याला गाळपास पाठवून सहकार्य करावे असे आवाहन ही शेवटी मॅनेजिंग डायरेक्टर  श्रीनिवास पाटील यांनी केले.

यावेळी चीफ इंजिनियर सुरेश शिंगटे, डे.चीफ केमिस्ट प्रकाश हेदु्रे, शेती अधिकारी राजाराम आमते.कार्यालयीन अधिक्षक बाबासाहेब देसाई, जमिर मकानदार, कन्हेंया गोरे, शिवाजी खरुडे, सतीश पाटील, अमृत कळेकर,दिलीप गायकवाड, प्रवीण बेवनूर, संताजी देसाई,मुराद काझी,उत्पादक शेतकरी व तोडणी वाहतूक कंत्राटदार व सर्व अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.

सभासदांचे हित जोपासत कार्यरत असणारा कारखाना म्हणून ख्याती…

कारखान्याचे आधारवड व माजी मंत्री श्रीमंत उर्फ तात्या पाटील यांच्या कल्पक नेतृत्वातून सर्व शेतकऱ्यांच्या मर्जीस उतरलेल्या अथणी शुगर भुदरगड युनिटच्या साखर कारखान्यास ऊस पाठवणाऱ्या ऊस सभासद शेतकऱ्यांचे हित जोपासत कार्यरत असणाऱा कारखाना म्हणून ख्याती प्राप्त करण्यात कारखाना यशस्वी झाला असून अनेक अडचणीची शर्यत पार करत त्यांची प्रगती थक्क करणारी ठरली आहे.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!