आपला जिल्हाक्रीडाताज्या घडामोडीनिपाणी परिसरमहाराष्ट्र

देवचंद मध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न!

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मौर्या ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक श्री मंगेश पाटील

Kiran G.Patil M.No.8884357516


विद्यार्थ्यांनी अपयशाने खचून न जाता सातत्य व चिकाटीने प्रयत्न केल्यास यशाच्या शिखरावर पोहोचता येते, असे प्रतिपादन मौर्य ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक श्री मंगेश पाटील यांनी व्यक्त केले. देवचंद महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरणा वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिषभाई शाह उपस्थित होते. यावेळी खजिनदार सुबोधभाई शाह, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सौ.जी.डी.इंगळे, उपप्राचार्य डॉ.पी.पी. शाह, IQAC प्रमुख डॉ.पी.डी.शिरगावे कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. ए. डी. पवार पर्यवेक्षिका सौ.एस.पी.जाधव जिमखानाप्रमुख डॉ.रवींद्र चव्हाण सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.रमेश साळुंखे व डॉ.भरत पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.जी.डी.इंगळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर डॉ.पी.पी.शाह यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. कार्यक्रमात क्रीडा विभाग,एन.सी.सी., एन.एस.एस.,देवचंद टॅलेंट सर्च परीक्षा, सायबर सुरक्षा विभाग व आविष्कार इत्यादी विभागातील 125 खेळाडू व गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू, ट्रॅकसूट, शूज, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

क्रीडा विभागातून प्रामुख्याने शिवछत्रपती विजेती खेळाडू कु.स्वाती शिंदे, कुस्तीपटू साताप्पा हिरुगडे हॉलीबॉल खेळाडू अनुप पाटील, शुभांगी खामकर, पवन पाटील तसेच वेटलिफ्टिंग खेळाडू अब्दुसमद सय्यद, प्रीतम चव्हाण, अंकित खुरपे, पृथ्वीराज चव्हाण, आरती पाटील, स्नेहल वराटे, हॉकी खेळाडू गणेश पाटील, स्वराज चौगुले, करण तळप, हर्षद जाधव, क्रिकेट खेळाडू प्रतीक भुइंबर, तायक्वांदो खेळाडू शहेनशाह मुजावर, वैष्णवी साळुंखे, तेजस्विनी तोरस्कर, निहाल ताशिलदार, बॉडीबिल्डिंग खेळाडू कृष्णा गोरे तसेच हॉकी, क्रिकेट व हॉलीबॉल टीममधील सर्व विजयी खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. पारितोषिक विजेत्यांच्या नावाचे वाचन प्राध्यापक डॉ. रवींद्र चव्हाण व प्रा. निरंजन जाधव यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.सौ. के.एस. कुंभार यांनी केले आभार प्रदर्शन डॉ.पी.डी शिरगावे यांनी केले. वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ यशस्वी करण्यासाठी जिमखाना कमिटी सदस्य प्रा. डॉ. सुजाता पाटील, प्रा.स्वप्निल कुंभार जिमखाना कर्मचारी संतोष वागळे, वैभव सोनार व खेळाडूंनी परिश्रम घेतले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!