क्राईमगुन्हाताज्या घडामोडीनिपाणी परिसरसंपादकीय

दुकानदाराला पोलिसांन घेरलं, अन् कॅमेराने तारलं!

निपाणीतील एका अजब घटनेची चर्चा दबक्या आवाजात!

Kiran G Patil M.No.8884357516


वरील बातमीचा  मथळा वाचून आपण थोडं आश्चर्यचकित व्हाल पण हे खर आहे. निपाणील एका घटनेवर आधारित हा मथळा असुन जर खरच त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नसते तर आज निपाणी मतदारसंघात एक वेगळ्याच गोष्टीवरून चर्चेचं गुराळ उठले असते.

आजच्या धावपळीच्या आधुनिक जगामध्ये जो तो “बिन पगारी फुल अधिकारी”असल्याच्या अविर्भावात नेहमीच धावपळीत असलेली एक जमात सध्या समाजामध्ये वावरत आहे. पहिल्यांदा वरील मथळ्याचा अर्थ थोडक्यात समजून घेणे क्रमप्राप्त आहे. आजच्या डिजिटल ऑनलाइन जगात सर्व व्यवहार घर बसल्या होत असल्यामुळे छोट्या-मोठ्या दुकानदारांचे व्यवसाय डबघाईस आलेले आपण पाहतोच, पण फास्ट फुडच्या जमान्यात ढेरपोट्या लोकांच्यामुळे व्यायामासाठी सायकल व्यवसाय विक्री व दुरुस्ती थोडा बरा चालू आहे. त्यामुळे एकंदरीत विक्री दुरुस्तीच्या सायकल दुकाना मध्ये थोडी वर्दळ असते. अशीच थोडी गर्दी निपाणी चन्नम्मा सर्कल येथील असणाऱ्या एका सायकल दुकानांमध्ये परवा होती. त्यातीलच एक ग्राहक आपले थोडे साहित्य खरेदी केल्यानंतर दुकानाच्या समोरच एक पिशवी ठेवुन जात असताना एका दुसऱ्या ग्राहकांने पाहून त्यांना सांगितले की पिशवी  विसरली आहे. त्यावर तो माणूस दुकानदाराला म्हणाला दादा पाच मिनिटे राहू दे पिशवी, मी माझा बाजार करून येतो व जाते वेळी ही पिशवी घेऊन जातो इथपर्यंत सर्व प्रकरण अगदी आलबेल वाटते.

दरम्यान, दुकानात पिशवी ठेवलेला इसम येण्याअगोदर चन्नम्मा सर्कल येथील सायकल दुकानांमध्ये  एक पोलीस निरीक्षक येतात व सरळ त्या सायकल दुकानदार व्यावसायिकाला म्हणतात “तु गांजा विक्री करतोस काय” “किती दिवसापासून हे चालू आहे” या व अशा शेकडो प्रश्नाचा भडिमार त्या दुकानदारावर केल्यामुळे  त्या दुकानदारांच्या  डोळ्यासमोर दिवसा काजवे चमकू लागले. त्याला हा प्रकार काय चालला आहे हेच मुळात समजेना, त्या निरीक्षकाने थोड्या वेळापूर्वी अनोळखी इसमाने ठेवलेल्या पिशवीतून गांजा बाहेर काढला व त्या दुकानदारास ताब्यात घेण्याचा प्रयत्न करू लागले. दुकानदार सर्व शक्ती एकवटून सांगत होता की ही पिशवी माझी नव्हे एक अनोळखी इसम ठेवून गेलेला आहे. तो बाजार करण्यास गेला आहे तो बाजार करून आल्यानंतर पिशवी घेऊन जाणार असे सांगून पिशवी ठेवून गेला आहे. या पिशवीशी माझा काही संबंध नाही आहे या पिशवीमध्ये काय आहे हे देखील मला माहीत नसल्यामुळे कृपया मला त्रास देण्याचा प्रयत्न करू नका या एका गोष्टीवर निरीक्षक ऐकायला तयार नव्हता. बघता बघता दुकानासमोर बघ्याची गर्दी वाढू लागली.

एकंदरीत घटनेचे गांभीर्य ओळखून एका सदृहस्थाने आसपास कोठे सीसीटीव्ही कॅमेरा असल्याची खात्री करून घेतली व तिथे जाऊन प्रत्यक्ष पाहता सर्व प्रकार पोलीस निरीक्षकाच्या लक्षात आल्यानंतर सायकल दुकानदारास हायसे वाटले. सीसीटीव्हीचे फुटेज चेक केल्यानंतर तो इसम दुकानात आल्यापासून ते पिशवी एका ठराविक जागी ठेवून पळून गेल्याचे स्पष्ट दिसत असल्यामुळे सायकल दुकानदारां वरील मळभ दूर झाले. व स्थानिक पोलिसांच्या मदतीने पंचनामा करून ती पिशवी ताब्यात घेण्यात आली. त्यामुळे दुकानदारांच्या दृष्टीने विचार केल्यास “दुकानदाराला पोलिसांन घेरलं, अन् कॅमेराने तारलं!” असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.


पण एक प्रश्न राहतो अनुत्तरीतच…

घडलेल्या घटनेचे थोडे विचार मंथन करावयाचे झाल्यास एक प्रश्न मात्र अनुत्तरीतच राहतो तो म्हणजे पोलीस निरीक्षक सरळ त्या दुकानात गेले कसे. कारण खरेदी करावयास निमित्त करून आलेला भामटा थोड्याच वेळात तिथुन बॅग ठेवून पसार झाला होता. पोलीस थोड्या वेळानंतर त्याच दुकानात नेमके जातात व पिशवी चेक करून यात गांजा आहे असे म्हणतात. हे मात्र एक गुढच म्हणावे लागेल एवढे नक्की.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!