ताज्या घडामोडीनिपाणी परिसरशैक्षणिक

देवचंद मध्ये मकर संक्रांतीचा सण उत्साहात साजरा

महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. जी. डी. इंगळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या!

Kiran G.Patil M.No.8884357516


देवचंद कॉलेज अर्जुननगर (कनिष्ठ) वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम विभागामार्फत *मकर संक्रांती* निमित्त *तिळगुळ तयार करणे व त्याचे सादरीकरण* हा उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. जी. डी. इंगळे मॅडम कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या त्यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षीय मनोगतामध्ये डॉ. जी डी. इंगळे यांनी मकर संक्रात सणाचे महत्त्व सांगत अशा स्पर्धात्मक कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रेरित होऊन सहभाग घेतल्यास विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकसित होईल, विविध कलागुण विकसित झाल्यास भावी जीवनात आर्थिक प्रगती साधण्यासाठी तसेच उद्योजक म्हणून स्थिरता प्राप्त होण्यास मदत होईल, असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. एन. एस. कोले यांनी केले. या स्पर्धेत 30 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी तिळगुळापासून बनवलेल्या विविध दागिन्यांच्या व इतर कला कृतींचे मूल्यमापन प्रा. सौ. वैशाली पाटील  व प्रा. सौ वर्षा मोहिते  यांनी केले. उत्कृष्ट सादरीकरण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

महाविद्यालयातील सर्व घटकांतर्फे उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. प्रा. डॉ. राहुल म्होपरे (अर्थशास्त्र विभाग वरिष्ठ ) यांनी व्यक्तिगतरीत्या सहभागी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पेन वाटप केले. यावेळी सौ. एन. ए. पाटील व सौ. आशा साळुंखे  यांनी महाविद्यालयातील महिला प्राध्यापिकांच्यासाठी संक्रांति निमित्त हळदी कुंक कार्यक्रमाचे आयोजन केले.

कार्यक्रमासाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. ए. डी. पवार , पर्यवेक्षक मेजर डॉ. ए. एस. डोनर , वाणिज्य विभागप्रमुख प्रा. बी एस कुंभार , व्यवसाय अभ्यासक्रम विभाग प्रमुख प्रा. एस. ए. पोवार , कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाकडील सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम पार पाडण्यासाठी वाणिज्य विभागातील सर्व प्राध्यापक वृंदांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार सौ. सुधा आरबोळे यांनी मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!