कृषीक्राईमताज्या घडामोडीनिपाणी परिसरमहाराष्ट्र

“अथणी शुगर्स “येथे रस्ता सुरक्षा अभियान!

मोटर वाहन निरीक्षक संदीप गडकर यांनी "रस्ता सुरक्षा अभियान २०२४ " या संदर्भातील संपूर्ण माहिती दिली!

Kiran G.Patil M.No.8884357516


अथनी शुगर्स भुदरगड युनिट साखर कारखान्यावर प्रादेशिक परिवहन कार्यालय कोल्हापूर व अथनी शुगर्स भुदरगड युनिट यांच्या वतीने “रस्ता सुरक्षा अभियान २०२४” हा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी कारखाना वाहन अड्डयातील सर्व ट्रॅक्टर,ट्रक वाहनांना रिफ्लेक्टर कापड वाटप करणेत आले.

या कार्यक्रम प्रसंगी प्रास्ताविक सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक श्रीमती ऋतुजा देसाई यांनी मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या अपघाताची कारणे व घ्यावयाची काळजी याबाबत वाहन मालकांना मार्गदर्शन केले व मोटर वाहन निरीक्षक संदीप गडकर यांनी “रस्ता सुरक्षा अभियान २०२४ ” या संदर्भातील संपूर्ण माहिती सविस्तरपणे सांगत असताना रस्त्यावरील सुरक्षेच्या संदर्भातील लावण्यात आलेल्या फलकांच्या सूचनां कडे जरी लक्ष दिले तर अपघाताचे प्रमाण कमी होऊ शकते असे सांगितले.

यावेळी मोटर वाहन निरीक्षक अनिल भादवण, डे. चीफ अकाउंटंट, जमीन मकानदार, लेबर ऑफिसर कन्हैया गोरे, शेती हेड क्लार्क उमेश शिंदे, वाहन मालक, ड्रायव्हर,शेतकरी, कर्मचारी उपस्थित होते. स्वागत व आभार कार्यालय अधीक्षक बाबासाहेब देसाई यांनी केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!