क्रीडाताज्या घडामोडीनिपाणी परिसरशैक्षणिक

उद्या 20 जानेवारीला आविष्कार अकादमी तर्फे निपाणीत “कविता मनातल्या” हा कार्यक्रम!

आय. एम. ए. हॉल, मंगळवार पेठ, निपाणी येथे सायंकाळी 6.30 वाजता!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी येथील आविष्कार सांस्कृतिक अकादमीचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. म्हणून दर महिन्याला एकापेक्षा एक दर्जेदार कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. याचाच एक भाग म्हणून दि. 20 जानेवारी 2024 रोजी आय. एम. ए. हॉल, मंगळवार पेठ,निपाणी येथे सायंकाळी 6.30 वाजता “कविता मनातल्या” ह्या काव्यवाचनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कोल्हापुरातील ॲस्टर आधार हॉस्पिटलचे संचालक व प्रमुख डॉ.अजित कुलकर्णी व डॉ.सौ. संयुक्ता कुलकर्णी हा कार्यक्रम सादर करणार आहेत. व्यवसायाने डॉक्टर असून मानवी दु:खाबद्दल त्यांच्या जाणिवा, संवेदना जागृत आहेत.या कार्यक्रमात ते नव्या जुन्या कवींच्या गाजलेल्या कविता तसेच स्वतःच्या कविता अतिशय रंजक पद्धतीने सादर करणार आहेत. काव्य सुचणं आणि त्यात आनंद शोधणं, ही परमेश्वराने माणसाला दिलेली एक अलौकिक देणगी आहे. सर्वसामान्य माणूस कवितेच्या फंदात पडत नाही, कारण ते अनाकलनीय असते. त्यातील आपणाला काही कळत नाही, असे समजतो. पण ह्या डॉक्टर दांपत्याचा हा कार्यक्रम पाहिल्या-ऐकल्यानंतर सर्वांचा हा गैरसमज दूर होईल. काव्य माणसाला आयुष्याकडे पाहण्याची नवी दृष्टी देते. दुखऱ्या मनावर फुंकर घालते. जगण्याची ताकद देते. माणसातील माणूसपण जागवते.

म्हणून निपाणी परिसरातील प्रत्येकाने या कार्यक्रमाचा निखळ आनंद घ्यावा, असे आवाहन अकादमीच्या अध्यक्षा डॉ. संगीता देशपांडे व डॉ. सुनीता देवर्षी यांनी केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!