उद्योजक शंतनु मानवी यांच्या निवासस्थानी खास. शरद पवारांची सदिच्छा भेट!
मानवी कुटुंबियांनी केला पवारांचा यथोचित सन्मान!
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खास. शरद पवार हे मंगळवारी निपाणी दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी निपाणीतील महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी आमदार कै. गोविंदराव मानवी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
यावेळी गोविंदराव मानवी यांचे नातू उद्योजक व दि.निपाणी को.ऑप इंडस्ट्रीयल इस्टेट चे यशस्वी माजी चेअरमन शंतनु मानवी, सौ.शरयू मानवी, अधोक्षज मानवी, कौशीकी मानवी व मानवी परिवाराने त्यांचे स्वागत केले. यावेळी पवार यांनी दिवंगत आम. गोविंदराव मानवी यांच्या कार्याचे कौतूक करून त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या कार्याचा वारसा कुटूंबियांनी यशस्वीपणे पुढे न्यावा अशा त्यांनी मानवी परिवारास सदिच्छा दिल्या. त्यावेळी त्याच्यासोबत निपाणी विधानसभा मतदारसंघाचे युथ आयकॉन व सहकार रत्न उत्तम पाटील हे उपस्थित होते.