आपला जिल्हाताज्या घडामोडीनिपाणी परिसरशैक्षणिक

देवचंद महाविद्यालयात मराठी विभाग आयोजित “मराठी भाषा आणि मराठी शाहिरी परंपरा” हा कार्यक्रम!

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी सुनील लोहार हे होते!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी दि २०, देवचंद कॉलेज, अर्जुननगर येथे मराठी विभाग आयोजित ‘मराठी भाषा आणि मराठी शाहिरी परंपरा’ हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी मा. श्री. सुनील लोहार हे लाभले. त्यांनी शाहिरीचे स्वरूप, शारिरीची परंपरा सांगितली. मराठी भाषेवर आधारित पोवाडा गायला, त्या पोवाड्यातून मराठी भाषेचे महत्त्व, भाषेतील संत, कवी, लेखक यांचा उल्लेख केला, त्याचबरोबर त्यांनी मराठी भाषा किती समृद्ध झाली आहे तेही स्पष्ट केले, शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्यावर संयुक्त पोवाडा सादर केला. त्यातून शिव जन्मकाळ, छ‌.शिवरायांच्या पराक्रमाचे वर्णन केले. म. फुले, छ. शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे वर्णन केले. इतनी शक्ती दे हे प्रार्थना गीत सादर केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. जी. डी. इंगळे उपस्थित होत्या. त्यावेळी बोलताना त्यांनी मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या निमित्त विविध कार्यक्रम घेतले जातात व ते वि‌द्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचे असतात असे सांगितले.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मराठी विभाप्रमुख डॉ. साळुंखे यांनी केले. त्यावेळी त्यांनी शाहिरीला लाभलेली परंपरा स्पष्ट केली. मनोरंजनातून प्रबोधन करणे हे शाहिरीतून होत असते. कार्यक्रमाचे आभार श्री. अनंत घोळवे यांनी मानले, पाहुण्यांचा परिचय प्रा विष्णु पाटील तर सूत्रसंचालन डॉ. ए. एन. खोत यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशीषभाई शाह यांचे प्रोत्साहन लाभले. कार्यक्रमासाठी प्रा. प्रकाश पाटील, प्रा. शिवाजी कुंभार, प्रा. नानासाहेब जामदार, श्री. आनंद संकपाळ, महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!