क्रीडाताज्या घडामोडीनिपाणी परिसरशैक्षणिक
देवचंद महाविद्यालयाच्या निहाल तासीलदारची राष्ट्रीय रग्बी स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ संघात निवड!
विजयी खेळाडूचे महाविद्यालयातील सर्व घटकांकडून कौतुक होत आहे!
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे नुकत्याच आंतरविभागीय रगबी स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेतून देवचंद महाविद्यालयाचा खेळाडू श्री निहाल तासीलदार याची शिवाजी विद्यापीठ रगबी संघात निवड झाली. सध्या तो शिवाजी विद्यापीठ संघातून चंदीगड युनिव्हर्सिटी मोहाली येथे अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेमध्ये सहभागी झालेला आहे. विजयी खेळाडूचे महाविद्यालयातील सर्व घटकांकडून कौतुक होत आहे.
विजयी खेळाडूंना जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिष शाह, उपाध्यक्ष डॉ.सौ. तृप्तीभाभी शाह, खजिनदार सुबोधभाई शाह यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सौ.जी.डी. इंगळे, उपप्राचार्य डॉ.पी.पी. शाह, जिमखाना प्रमुख डॉ. रवींद्र चव्हाण, जिमखाना कर्मचारी श्री. संतोष वागळे व श्री. वैभव सोनार यांचे मार्गदर्शन लाभले .