Entertainmentआपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

लढवय्या मनोज भाऊंच्या सर्व मागण्या मान्य!

स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येऊन उपोषण सोडवणार!

Kiran G.Patil M.No.8884357516


अखंड रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून गेली कित्येक दिवस चालू झालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास अखेर यश आले असून त्यांच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या असून त्यांची उपोषण सोडण्यासाठी मुख्यमंत्री थोड्याच वेळात कार्यक्रम स्थळ येऊन उपोषण सोडवणार आहेत.

नवी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये प्रत्यक्ष सभेला सुरुवात होणार असून प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुष्पहार अर्पण करून उपोषण सोडवले जाणार असून त्यावेळी मुख्यमंत्री व जनाजी पाटील यांच्यावर पुष्पवृष्टी केली जाणार आहे.

वंशावळी शोधण्यासाठी समिती स्थापन केली जाणार असून, सग्या सोयऱ्यांसह कुणबी प्रमाणपत्र असल्याचा दाखला मिळणार असून जरांगेनी आपला शब्द खरा केल्याचे सर्वत्र मान्य केले जात आहे. आता भुजबळांचा कार्यक्रम संपला असून काट्या लाढ्याच्या लढाईत कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यामुळे मला समाधान मिळाले असून, या लढ्यामध्ये अनेकांनी हाला पेस्ट असल्यामुळेच हा दिवस आपण पाहत असल्याचे जरांगे पाटील माध्यमांशी बोलताना सांगत होते. भविष्यात देखील आरक्षणाला अडथळा आल्यास पुन्हा उपोषण करू असं सज्जड दमच जरांगे पाटलांनी भरला होता. सध्या मनोज राजे पाटील यांची वाशिम मधून विजय रॅली निघाली असून ते मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी जात असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः जरांगे पाटलांना भेटून उपोषण सोडण्यासाठी ज्यूस देऊन अध्यादेशाची कॉपी देणार आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!