Entertainmentआपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

“यायलाच पाहिजे” शिक्षकच घालत आहेत विद्यार्थ्यांना साद! चाळीस वर्षानंतर विद्यार्थी शिक्षक भेट!

निपाणी कुमार मंदिर 1982-83 सालातील विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन!

Kiran G.Patil M.No.8884357516


बरीच स्नेहसंमेलन होतात पण उद्या होणारं स्नेहसंमेलन थोडं हटके आहे. असे म्हटल्यास वावगे ठरू नये. कारण उद्या रविवारी 28 जानेवारी 2024 रोजी कुमार मंदिर निपाणी 1982-83 चे स्नेह संमेलन देवचंद महाविद्यालयात संपन्न होत आहे. दिवसभर हे संमेलन भरगच्च कार्यक्रमा ने भरलेलं आहे. ह्या कार्यक्रमा मध्ये विद्यार्थी जवळ जवळ 40 वर्षांनी भेटणार आहेत. त्यामुळे सर्वच विद्यार्थीना ह्या कार्यक्रमा विषयी कमालीची उत्सुकता लागलेली आहे. ह्या स्नेह संमेलना चे निमंत्रण एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने देण्यात आलेले आहे.

अनेक ठिकाणी स्नेहसंमेलन करायचे असल्यास आपल्या जडणघडणीमध्ये मोलाचा वाटा उचलणाऱ्या शिक्षकांना बोलावून साजरा केला जातो पण हे स्नेहसंमेलन वेगळे असून यामध्ये निपाणी कुमार मंदिर चे वयोवृद्ध शिक्षक सर्व विद्यार्थ्यांना यायलाच पाहिजे म्हणून हाक घालत आहे. यामध्ये जाधव गुरुजी, कुंभार गुरुजी, शेटके गुरुजी, मानवी गुरुजी, कमलाकर माईजी साद घालत असल्यामुळे हे स्नेहसंमेलन निपाणी तालुक्यामध्ये एक मैलाचा दगड ठरू शकेल. यात तिळमात्र शंका नाही.


Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!