आपला जिल्हाकृषीताज्या घडामोडीनिपाणी परिसरराजकीय

मांगुर फाटा भराव आंदोलकांची दिल्ली वारी यशस्वी! 

सहकाररत्न तथा युथ आयकॉन उत्तम पाटील यांच्या मागणीला घवघवीत यश!

Kiran G.Patil M.No.8884357516


शब्दाला जगणारे वयाची 83 वर्षे पूर्ण करून सर्व शेतकरी कष्टकरी जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडून त्याची सोडवणूक करणारे माजी कृषिमंत्री शरदचंद्र पवार याच्या नेतृत्व कौशल्याने आणि सहकाररत्न व युवा नेते उत्तम रावसाहेब पाटील यांच्या सहकार्याने केंद्रीय वाहतूक दळणवळण मंत्री श्री नितीन गडकरी आणि राष्ट्रीय महामार्ग यांच्याकडून वेदगंगा नदीकाठ बचाव कृती समितीच्या शिलेदारांना गेली दोन महिने करत असलेल्या प्रयत्नाला यश आले. 

मांगुर फाटा भराव हटवून पिलर ब्रीज कामास सहमती दर्शवून संबंधित अधिकारी यांना निर्देश दिले. याप्रसंगी कृती समितीचे के डी पाटील, लक्ष्मीकांत पाटील चंद्रशेखर सावंत,अजित पाटील,दीपक पाटील,सुदीप वाळके,शिवाजी पाटील, अमोल पाटील, नानासाहेब पाटील, निरंजन पाटील सरकार, राजेखान जमादार उपस्थित होते.

या लढ्याला आपल्या परीने मदत आणि  पाठबळ देणाऱ्या सर्वांचे वेदगंगा नदीकाठ बचाव कृती समितीच्या शिलेदारांनी आभार व्यक्त केले असून इथून पुढे देखील सामाजिक कार्यात सहकार्य करण्याचे आवाहन केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!