आपला जिल्हाताज्या घडामोडीनिपाणी परिसरराजकीयशैक्षणिक

देवचंद महाविद्यालयात आज मतदार दिनानिमित्त राज्यशास्त्र विभागामार्फत वक्तृत्व स्पर्धा!

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्रा. डॉ.जी.डी. इंगळे होत्या!

Kiran G.Patil M.No.8884357516


देवचंद महाविद्यालयात आज मतदार दिनानिमित्त राज्यशास्त्र विभागामार्फत वक्तृत्व स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा आणि मतदार प्रतिज्ञा वाचन या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ‘मतदार लोकशाहीचा भक्कम आधार’या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आले. मतदार जागृतीसाठी विविध घोषवाक्यांची स्पर्धा घेण्यात आल्या. त्यानंतर मतदान करण्याविषयी मतदार म्हणून महाविद्यालयातील मतदार विद्यार्थी व उपस्थितां कडून प्रतिज्ञा घेण्यात आली. प्रतिज्ञेचे वाचन प्रा. नामदेव मधाळे यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.जी.डी. इंगळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या नागरिकांनी मतदार म्हणून त्यांच्या हक्क , कर्तव्य व जबाबदारी विषयी जागरूक असावे, सरकार बनविण्यात मतदाराची महत्त्वाची भूमिका असते, देशाची प्रगती आणि विकास मतदानाने ठरविले जाते आणि म्हणूनच देशाचा जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाने मतदान केले पाहिजे.

या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष आशिषभाई शाह, उपाध्यक्षा डॉ.सौ. तृप्तीभाभी शाह, उपप्राचार्य प्रो.डॉ. प्रशांत शाह यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले.‌ कार्यक्रमाचे स्वागत प्रा. तुकाराम पाटील व प्रास्ताविक प्रा. डॉ. सुजाता पाटील यांनी केले.यावेळी महाविद्यालयाचे विद्यार्थी व ज्यु. विभागाचे उपप्राचार्य अशोक पवार, डॉ.राहुल घटेकरी, प्रा.एन.डी.कुंभार, प्रा.विकास माने, प्रा.एस.जी.कुंभार, प्रा.बी.एस.कुंभार इ. प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!