क्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रशैक्षणिक

बेळगांव मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरची गडकोट मोहीम!

ऐतिहासिक महत्त्व दर्शविण्यासाठी संपूर्ण रेजिमेंटमध्ये “मराठा दिवस” याचे औचित्य साधत!.

Kiran G Patil M.No.8884357516


04 फेब्रुवारी 2024 रोजी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर येथे एका मार्मिक समारंभात “मराठा दिन” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या दिवसाची आठवण म्हणून रेजिमेंट मधील एकूण 16 ते 18 जणांनी मेजर संदीप कुमार यांच्या नेतृत्वाखाली किल्ले ते किल्ले सायकल मोहिमेचा आराखडा तयार करून प्रत्यक्ष मोहीम सुरुवात केली. या गडकोट मोहिमे मधील सायकल स्वार काल निपाणी येथील गुरुकुल करिअर अकॅडमी मध्ये विश्रांतीसाठी थांबले होते.

प्रारंभी काल संध्याकाळी अकॅडमी तर्फे व आजी-माजी सैनिकांतर्फे सर्व सायकल स्वार आजी-माजी सैनिकांना गडकोट मोहिमेसाठी शुभेच्छा देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना गडकोट मोहिमेचे मुख्य मेजर संदीप कुमार म्हणाले देश सेवा करत असताना आपली भारतीय संस्कृती काय आहे याचे देखील सर्वांना माहीती असणे गरजेचे असून व मराठा लाईट इन्फंट्रीचा उद्देश सफल होण्यासाठी  ही गडकोट मोहीम आखली असल्याचे सांगितले.

मराठा सैनिकांची लवचिकता आणि सहनशीलता प्रदर्शित करण्यासाठी गडकोट मोहीम करण्याचे ठरवले असल्याचे समजते. 1670 मध्ये या दिवशी मराठा शासक व रयतेचे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी पुण्याजवळील प्रसिद्ध कोंढाणा किल्ला (आता सिंहगड म्हणून ओळखला जातो) जिंकला. म्हणून 04 फेब्रुवारी हा ऐतिहासिक महत्त्व दर्शविण्यासाठी संपूर्ण रेजिमेंटमध्ये “मराठा दिवस” म्हणून साजरा केला जातो. तानाजी मालुसरे, छत्रपती, लष्करी नेता शौर्याने लढले आणि किल्ला जिंकण्यासाठी सर्वोच्च बलिदान दिले.

उत्साही सायकल स्वारां मध्ये सेवारत आणि सेवानिवृत्त रेजिमेंट कर्मचाऱ्यांचा समावेश आहे ज्यांनी मराठा रेजिमेंटच्या अदम्य भावनेचे प्रतीक असलेल्या एका ऐतिहासिक किल्ल्यावरून दुसऱ्या ऐतिहासिक किल्ल्या पर्यंतचा हा आव्हानात्मक प्रवास सुरू केला आहे. या सायकल स्वरांच्या गडकोट मोहिमेमध्ये 4 मराठा लाईट इन्फंट्री चे माजी सैनिक हवालदार (Retd) कृष्णा अब्दागिरी निपाणी व हवालदार (Retd) दिनकर पाटील नाशिक यांचा सहभाग आहे.

यावेळी सुभेदार शिवाजी पाटील नायब सुभेदार अनिल तिबिले, गुरुकुल करिअर अकॅडमीचे हवालदार चारुदत्त पावले माजी सैनिक अशोक रेंदाळे, महादेव पाटील, संजय इंगळे, युवराज पाटील, बाळू चव्हाण, दिनकर पावले आधी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!