कृषीताज्या घडामोडीनिपाणी परिसरमहाराष्ट्र

अथणी शुगर, भुदरगडची १५ जानेवारी पर्यंतची ऊस बिले जमा!

अशी माहिती कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर श्रीनिवास पाटील यांनी दिली.

Kiran G Patil M.No.8884357516


अथणी शुगर लि.भुदरगड युनिटची सन २०२३/२४ हंगामातील १५ जानेवारी पर्यंतची ऊस बिले विना कपात एकरक्कमी प्रति मे.टन ३२०० /-रुपये प्रमाणे संबंधित ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली आहेत. व १५ जानेवारी पर्यंतची तोडणी वाहतुकीची बिले जमा केलेची माहिती कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर मा.श्री श्रीनिवास पाटील यांनी दिली.

यावर्षीचा गळीत हंगाम उत्तमरित्या सुरू असून त्यासाठी कारखान्याने योग्य नियोजन केले असल्याने सध्या कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू आहे त्यामुळे ८६ दिवसात २,४८,७५१ मे. टन गाळप झाले असून सरासरी ११.३५ रिकव्हरीने २,८०,१६० क्विंटल इतकी साखर उत्पादित झाली आहे.

बाजारपेठेमध्ये साखरेच्या भावात चढ-उतार होत असला तरी आपल्या व्यवस्थापनाने आज पर्यंत झालेल्या सर्व हंगामामध्ये शेतकऱ्यांच्या नेहमी हिताचा विचार केल्यामुळे सर्व उत्पादक शेतकऱ्यांनी आमच्या साखर कारखान्यावर विश्वास ठेवून उस्फूर्तपणे ऊस पुरवठा करत आहेत त्यामुळे आम्ही सुद्धा शेजारच्या कारखान्याच्या आसपास तसेच सर्वात अगोदर दर पंधरवड्याची ऊस बिले वेळेवर देत आहोत .तसेच या पुढे सुद्धा दर पंधरवड्याची ऊस बिले वेळेवर ऊस उत्पादकांच्या नावावर जमा केली जातील.तरी सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पिकवलेला सर्व ऊस आमच्या कारखान्याला गाळपास पाठवून सहकार्य करावे असे आवाहन मॅनेजिंग डायरेक्टर मा. श्रीनिवास पाटील यांनी केले.

यावेळी डे.चीफ केमिस्ट प्रकाश हेदु्रे,शेती अधिकारी राजाराम आमते.कार्यालयीन अधिक्षक बाबासाहेब देसाई, डे. चीफ अकाऊंट जमिर मकानदार, ज्यु.लेबर ऑफिसर कन्हेंया गोरे उत्पादक शेतकरी व तोडणी वाहतूक कंत्राटदार व सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!