Entertainmentताज्या घडामोडीशैक्षणिक

मराठा मंडळ निपाणी या संस्थेचा शैक्षणिक वर्षाचा वार्षिक स्नेहसंमेलन ” गुंजन २०२४” अत्यंत उत्साहात साजरा!

"गुंजन 2024" या कार्यक्रमाचे अध्यक्ष- माजी ऊर्जामंत्री  वीरकुमार पाटील होते!


Kiran G.Patil M.No.8884357516


मराठा मंडळ निपाणी संचलित, बालवाडी , मराठी विद्यानिकेतन प्राथमिक शाळा ( अनुदानित) व निपाणी मराठा मंडळ हायस्कूल, निपाणी. या शैक्षणिक वर्षाचा वार्षिक स्नेहसंमेलन *” गुंजन २०२४”* अत्यंत उत्साहात गुरुवारी १५ फेब्रुवारी २०२४ रोजी पार पडला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्राथमिक व माध्यमिकच्या विद्यार्थिनींनी इशस्तवन सादर केले. त्यानंतर सरस्वतीचे व कै. रघुनाथराव कदम (दादा) यांच्या फोटोचे पूजन  माजी आमदार सुभाष जोशी माजी नगराध्यक्ष श्री चंद्रकांत जासूद, मराठा मंडळचे अध्यक्ष रविंद्र कदम, शिक्षण समितीचे चेअरमन राजेश कदम , सौ. संगीता रविंद्र कदम, सौ. ज्योती राजेश कदम, माजी सभापती श्री.किरण कोकरे, माजी नगरसेवक श्री. संदीप चावरेकर उपस्थित होते . तसेच पालकांच्या मध्ये हौशाबाई जाधव ,श्री.रविंद्र शिंदे उपस्थित होते यांच्या अमृत हस्ते फोटोचे पूजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय निपाणी मराठा मंडळ हायस्कूलचे मुख्याध्यापक- श्री.डी. डी. हळवणकर  यांनी करून दिले. कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने- प्रमुख पाहुणे हृदयरोग तज्ञ डॉक्टर अर्जुन आडनाईक व उपस्थित मान्यवरांच्या अमृत हस्ते झाले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष- माजी ऊर्जामंत्री  विरकुमारजी पाटील  यांचा सत्कार, प्रमुख पाहुण्यांचा सत्कार तसेच निपाणी मराठा मंडळच्या शिक्षण संस्थेला प्रदीर्घ सेवा दिल्याबद्दल मुख्याध्यापक आदरणीय श्री.बाजीराव पाटील  श्री श्रीधर मेकळके तसेच पुंडलिक एम सुतार यांचा सत्कार मराठा मंडळाचे अध्यक्ष रवींद्र कदम व शिक्षण समिती चेअरमन राजेश कदम यांच्या अमृत हस्ते करण्यात आला.

यावेळी एस.एस.एल.सी बोर्ड परीक्षा 2023 मध्ये प्रथम आलेल्या कु.गौरी सुधीर जोशी तसेच इयत्ता सातवी मध्ये प्रथम आलेल्या कु.सादिया सलीम नदाफ ,व वार्षिक क्रीडा स्पर्धेमध्ये उत्कृष्ट खेळाडू माध्यमिक-कु.पृथ्वीराज राजेंद्र सापळे, कु.गीतांजली विठ्ठल शेंडगे तर प्राथमिक मधून कु.उत्कर्ष राजेंद्र रणदिवे व कु.प्राची संजय हजारे यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे डॉक्टर अर्जुन आडनाईक यांनी विद्यार्थ्यांना संस्कार व आधुनिक शिक्षण पद्धतीचे ज्ञान घेण्याचे आव्हान केले. तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांच्या बरोबर पालकांनी सुद्धा जास्त वेळ विद्यार्थ्यांना दिला पाहिजे. विद्यार्थ्यांनी या स्पर्धेच्या युगात स्वतःला जास्तीत जास्त वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्याचे आव्हान केले.

निवृत्त मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. गुंजन २०२३-२०२४ च्या वार्षिक स्नेहसंमेलना मध्ये विद्यार्थ्यांनी विविध कला गुणांचा अविष्कार दाखविला.

उपस्थित सर्व पाहुण्यांचे आभार शिक्षण समितीचे चेअरमन राजेश कदम यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी *गुंजन २०२३-२४* चे चेअरमन श्री.संजय साखळकर व श्रीमती ढंगे, प्राथमिकचे मुख्याध्यापक श्री.बी आर मोहिते सर्व शिक्षक वर्ग यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.ए एम यादव यांनी केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!