क्रीडाताज्या घडामोडीनिपाणी परिसरशैक्षणिक

शिवनेरी गडकोट मोहिमेची तयारी अंतिम टप्यात!

आकाश माने यांची माहिती, निपाणी मावळा ग्रुपकडून आयोजन!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी : येथील मावळा ग्रुप निपाणी यांच्या वतीने तृतीय वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या शिवनेरी गडकोट मोहिमेची तयारी अंतिम टप्यात आली आहे. यावर्षी प्रथमच मावळा ग्रुपच्या वतीने आयोजित गडकोट मोहिमेत महिला सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमिवर सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती मावळा ग्रुपचे अध्यक्ष आकाश माने यांनी दिली.

प्रतिवर्षी निपाणी तालुक्यातील युवकांसाठी मावळा ग्रुप गडकोट मोहीम आयोजित करत असते. यावर्षी प्रथमच मावळा ग्रुपने मोहिमेत महिलांना सहभागी करून घेतले आहे. यामुळे या मोहिमेबद्दल आकर्षण निर्माण झाले आहे. मावळा ग्रुपने पहिल्या वर्षी किल्ले प्रतापगड, रायगड त्यानंतर किल्ले सज्जनगड व राजगड या मोहिमा केल्या आहेत. यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीवर गडकोट मोहीम आयोजित केली आहे. या मोहिमेसाठी महिला व युवकांनाही सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. याचा फायदा घेत अनेक महिलांनी यामध्ये नोंदणी केली आहे.

युवकांची नोंदणी झाली असून येत्या 23 रोजी रात्री दहा वाजता मोहिमेचे प्रस्थान होणार आहे. 24 रोजी सकाळी वडू बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन केल्यानंतर लेण्याद्री येथे ही मोहीम पोहोचणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 25 रोजी सकाळी शिवनेरी गड दर्शन होणार आहे. या मोहिमेत परमपूज्य प्राणलिंग महास्वामीजी यांचे दिव्य सानिध्य लाभणार आहे. या मोहिमेसाठी उपाध्यक्ष महादेव चव्हाण, खजिनदार राहुल सडोलकर भाटले, ग्रामीण अध्यक्ष संतोष चव्हाण, शहराध्यक्ष अनिल चौगुले, सन्मेश जाधव, विनायक खवरे, संजय चिकोडे, उदय शिंदे, राहुल पाटील, हेमंत चव्हाण, महादेव बन्ने, विजय बुरुड, सुशांत कांबळे, शांतिनाथ मुद्कुडे, सागर खांबे, यांच्यासह मावळा ग्रुपचे सदस्य परिश्रम घेत आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!