निलोफर सुलताना जमादार हिची इंडियन नेव्ही मध्ये निवड!
देवचंद महाविद्यालय अर्जुननगर येथे इयत्ता बारावी वाणिज्य शाखेत शिकत असलेली विद्यार्थिनी
देवचंद महाविद्यालय अर्जुननगर येथे इयत्ता बारावी वाणिज्य शाखेत शिकत असलेली विद्यार्थिनी निलोफर सुलताना जमादार हिची इंडियन नेव्ही मध्ये निवड झाली. या निमित्ताने महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रो.डॉ. जी.डी.इंगळे यांनी तिचे पुष्पगुच्छ देऊन हार्दिक अभिनंदन केले .याप्रसंगी बोलताना निलोफर जमादार म्हणाली की या निवडीमध्ये मला मार्गदर्शन करणाऱ्या माझ्या आई-वडिलांची, या महाविद्यालयातील प्राचार्यांची तसेच मला घडवणाऱ्या सर्व प्राध्यापक वृंदाची आणि माझे मार्गदर्शक सुमित कुमार यांची मोलाची भूमिका आहे.
या महाविद्यालयात मला प्रोत्साहन मिळाले त्याबद्दल या महाविद्यालयाची मी सदैव ऋणी राहीन. याप्रसंगी प्रो. डॉ. जी.डी. इंगळे म्हणाल्या की विद्यार्थिनींनी आपल्यातील क्षमता सिद्ध केल्यास त्यांनाही देशसेवा करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते. याप्रसंगी वाणिज्य विभागाच्या प्रा. राणी सोकासने व प्रा सुधा आरबोळे उपस्थित होत्या.