ताज्या घडामोडीनिपाणी परिसरशैक्षणिक

निपाणीत मराठा मंडळ येथे अंगणवाडी सेविकांचा सत्कार समारंभ!

कार्यक्रमाच्या अध्यक्षा निपाणी बालकल्याण विभागाच्या जयश्री कौजलगी यांची उपस्थिती!

Kiran G Patil M.No8884357516


मराठा मंडळ संचलित, बालवाडी, मराठी विद्यानिकेतन प्राथमिक शाळा व निपाणी मराठा मंडळ हायस्कूल,निपाणी. यांच्या संयुक्त विद्यमाने मराठा मंडळ सांस्कृतिक भवन येथे संस्थेच्या वतीने निपाणी परिसरातील सर्व अंगणवाडी शिक्षकेचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.

19 फेब्रुवारी शिवजयंती निमित्त शिवाजी महाराजांचा प्रतिमेचे पूजन तसेच मराठा मंडळ संस्थेचे संस्थापक बहुजन समाजाचे नेते कै.रघुनाथराव कदम (दादा) यांच्या प्रतिमेचे पूजन मराठा मंडळाचे अध्यक्ष रविंद्र रघुनाथराव कदम , मराठा मंडळ शिक्षण समितीचे चेअरमन राजेश रघुनाथराव कदम, सौ.संगीता रवींद्र कदम, सौ.ज्योती राजेश कदम, या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ.जयश्री कौजलगी तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे-शशिकला बने, सौ.सुनीता कोळी, सौ.तेजस्विनी रावळ, मराठा मंडळ प्राथमिक व माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिल्पा कांबळे  यांनी केले. शिव जयंती निमित्त निपाणी मराठा मंडळ हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री.डी.डी.हळवणकर  यांनी मनोगत व्यक्त केले. अंगणवाडी सेविकांच्या बदल श्री.ए .एम यादव यांनी मनोगत व्यक्त केले. सर्व उपस्थित अंगणवाडी सेविकांचा सत्कार सौ.संगीता रवींद्र कदम व सौ.ज्योती राजेश कदम यांच्या हस्ते करण्यात आला.

अंगणवाडी शिक्षक सेविकांच्या मधून आनंदी कदम व सुरेखा मगदूम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्षा- सौ.जयश्री कौजलगी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्या बोलत असताना म्हणाल्या “अंगणवाडी हा शिक्षणाचा पाया आहे.” आणि आज मराठा मंडळ संस्थेने अंगणवाडी सेविकांचा केलेला हा सत्कार अर्थात अंगणवाडी सेविकेच्या पाठीवर मारलेली थाप आहे. अशा शब्दात त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

शिक्षण समितीचे चेअरमन राजेश रघुनाथराव कदम यांनी समाजामध्ये असणाऱ्या अंगणवाडी सेविकांचे महत्त्व पटवून सांगितले. आणि अंगणवाडीच्या वृद्धीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती.जयश्री ढंगे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन- सौ.प्रभा घाटगे  यांनी केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी तसेच बालवाडी ,प्राथमिक, माध्यमिक सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे मोठे सहकार्य लाभले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!