ताज्या घडामोडी

देशव्यापी संपाला मावळ सराफ असोसिएशनचा पाठिंबा

सराफ व्यावसायिकांनी ठेवली दुकाने बंद

तळेगाव : सोन्याच्या दागिन्यांसाठी अनोखा संकेतांक (HUID) नोंदवण्याची सक्ती करण्यात आल्याने आज देशभरातील सराफ व्यावसायिकांनी लाक्षणिक संप पुकारला आहे. मावळातील सराफांनी या बंदला उत्स्फूर्त पाठिंबा देत सर्व व्यवहार बंद ठेवले आहेत.

16 जूनपासून 256 जिल्ह्यांमध्ये हॉलमार्क अनिवार्य करण्यात आले आहे. हॉलमार्क प्रमाणपत्राचे सराफांनी स्वागत केले आहे. परंतु प्रत्येक दागिन्याला (एचयूआडी)अनोखा संकेतांक नोंदवण्याची सक्ती अव्यवहार्य व मनमानी आहे, असे सराफ असोसिएशनचे म्हणणे आहे. याच सक्ती विरोधात आज संप पुकारण्यात आला आहे.

मावळातील सराफांनी या बंदला पूर्णपणे पाठिंबा देत आपली दुकाने बंद ठेवली आहेत. हॉलमार्किंग मधली एचयूआयडी पद्धत जाचक आहे.एचयूआयडी पद्धतीमुळे सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीत वाढ होऊन ग्राहकांचे नुकसान होण्याची शक्यता मावळ सराफ असोसिएशन च्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.

मावळ सराफ असोसिएशनचे अध्यक्ष सागर शहा, खजिनदार मंगेश पालरेचा, सचिव विनोद राठोड, महेंद्र राठोड, अभय बाफना, सुरेश परमार यांनी ही माहिती दिली.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!