ताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रशैक्षणिक

देवचंद कॉलेज,अर्जुननगर येथे एलआयसी सल्लागार प्रशिक्षण संपन्न

स्वयंसिध्दा सचेतना मंडळामार्फत विद्यार्थिनी करिता एकदिवशीय एलआयसी सल्लागार प्रशिक्षण संपन्न झाले

Kiran G.Patil M.No.8884357516


देवचंद कॉलेज, अर्जुननगर येथील स्वयंसिध्दा सचेतना मंडळामार्फत विद्यार्थिनी करिता एकदिवशीय एलआयसी सल्लागार प्रशिक्षण संपन्न झाले. या प्रशिक्षणाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये रोजगार कौशल्य विकसित करून महिलांचे सक्षमीकरण करणे हा होता.

सदर प्रशिक्षणाचे तीन सत्रात आयोजन करण्यात आले. प्रथम सत्रातील प्रमुख वक्ते म्हणून मा. श्री प्रदीप शाह यांनी कोणत्याही भांडवला शिवाय किंवा कौशल्याच्या आधारावर एलआयसी व्यवसायात रोजगाराच्या असणाऱ्या विविध संधीची ओळख करून देत एलआयसी मध्ये कशाप्रकारे करिअर करू शकतात याबाबत मार्गदर्शन केले. प्रशिक्षणाच्या दुसऱ्या सत्रामध्ये प्रमुख व्याख्याते श्री. जितेंद्र अरचक यांनी आपल्या मार्गदर्शनातुन विद्यार्थ्यांना महिला सबलीकरण करण्यासाठी शिक्षण आणि आर्थिक गुंतवणूक किती महत्त्वाची आहे हे सांगत असताना एलआयसी मधील कामाची लवचिकता, वेळेचे बंधन नसणे, कोणत्याही वरिष्ठांशी हुकूमत नसणे तसेच महिला आपल्या इतर व्यवसाय, कौटुंबिक जबाबदारी पार पाडत हा व्यवसाय कसा करू शकतात, याबाबतचे मार्गदर्शन करताना त्यांनी या व्यवसायासाठी आवश्यक असणाऱ्या परीक्षेची माहिती विद्यार्थ्यांना करून दिली. प्रशिक्षणाच्या तिसऱ्या सत्राचे प्रमुख वक्ते मा.श्री कैलास भारमल यांनी विद्यार्थ्यांना आपल्या कार्यक्षेत्रा मध्ये यश प्राप्त करण्यासाठी कष्टाची गरज असून आपल्या गुणांचा समाजासाठी उपयोग करून देणे ही आपली जबाबदारी आहे. व यासाठी प्रथमतः आपण आपले उद्दिष्ट निश्चित केले पाहिजे, ध्येय पूर्ततेसाठी त्याचा पाठलाग करून त्या दिशेने मार्गक्रमाना केली पाहिजे याची जाणीव विद्यार्थ्यांना करून दिली. जो विद्यार्थी आपल्या शैक्षणिक कालावधीतील मिळालेला वेळ आपल्या करिअरच्या प्राप्तीसाठी खर्ची घालतो. तोच यशस्वी होऊ शकतो असे नमूद करत एलआयसी मधील एखादा सल्लागार किती आर्थिक प्राप्ती करू शकतो हे त्यांनी रिचु नंदा व भारत पारखे यांची उदाहरण देऊन स्पष्ट केले.

आय क्यू ए सी चे समन्वयक प्रा. डॉ. पी.डी.शिरगावे अध्यक्ष भाषणातून विद्यार्थ्यांना स्वयंसिद्धा मंडळामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेल्या सदरील प्रशिक्षणाचा उपयोग करून घ्यावा असे विद्यार्थ्यांना आव्हान केले व पुढील वाटचालीत करिता शुभेच्छा दिल्या. कार्यशाळेच्या पूर्ततेसाठी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिषभाई शाह, उपाध्यक्षा मा. डॉ. सौ.तृप्तीभाभी शाह यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले .तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रो. डॉ. जी. डी. इंगळे, उपप्राचार्य प्रो. डॉ. पी. पी. शहा यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. प्रशिक्षण कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत डॉ.सुषमा जाधव- लिमकर यांनी केले व आभार डॉ. सुप्रिया देसाई यांनी मानाले. तर सूत्रसंचालन डॉ. सुजाता पाटील यांनी केले. या प्रशिक्षणासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!