ताज्या घडामोडी

अथणी शुगर, भुदरगड युनिटची 31 जानेवारी पर्यंतची ऊस बिले जमा!

एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर श्रीनिवास पाटील यांनी दिली माहिती!

Kiran G.Patil M.No.8884357516


अथणी शुगर लि.भुदरगड युनिटची सन 2023/24 हंगामातील 16 जानेवारी ते 31जानेवारी पर्यंतची ऊस बिले विनाकपात एकरक्कमी प्रति मे.टन 3200 /- प्रमाणे संबंधित ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली आहेत तसेच तोडणी वाहतुकीची बिले 15 फेब्रुवारी पर्यंतची जमा केलेची माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर श्रीनिवास पाटील यांनी दिली.

यावर्षीचा गळीत हंगाम उत्तमरित्या सुरू असून त्यासाठी कारखान्याने योग्य नियोजन केले असून संपूर्ण ऊस संपेपर्यत कारखाना सुरू राहणार आहे.आजपर्यँत 107 दिवसात 3,08,449 मे. टन गाळप झाले असून सरासरी 11.73 रिकव्हरीने 3,59,270 क्विंटल इतकी साखर उत्पादित झाली आहे.

 कारखाना चेअरमन व संचालक मंडळा यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील ऊसाचे उत्पादन वाढावे यासाठी नवनवीन ऊस जातीचे डेमो प्लॉट करून गावोगावी चर्चासत्र सुरु आहेत, यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन वाढून नक्कीच फायदा होणार आहे या सर्व कारणामुळे शेतकऱ्यांचा विश्वास अथणी शुगरवर वाढलेला असून आमची नियोजित क्रशिंग कडे वाटचाल सुरु आहे. बाजारपेठेमध्ये साखरेच्या भावात चढ-उतार होत असला तरी आपल्या व्यवस्थापनाने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून ऊस बिले वेळेवर दिली आहेत तरी सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पिकवलेला सर्व ऊस आमच्या कारखान्याला गाळपास पाठवून सहकार्य करावे असे आवाहन मॅनेजिंग डायरेक्टर मा. श्रीनिवास पाटील यांनी केले.

यावेळी चीफ इंजिनियर सुरेश शिंगटे, डे.चीफ केमिस्ट प्रकाश हेदु्रे,शेती अधिकारी राजाराम आमते.कार्यालयीन अधिक्षक बाबासाहेब देसाई, जमिर मकानदार, कन्हेंया गोरे, शिवाजी खरुडे, सतीश पाटील, अमृत कळेकर,दिलीप गायकवाड, प्रवीण बेवनूर, संताजी देसाई,मुराद काझी,उत्पादक शेतकरी व तोडणी वाहतूक कंत्राटदार व सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!