आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरशैक्षणिक

निपाणी शहरात आयसीयू व डायलिसिस विभाग लवकरच सुरू करणार- डॉ.प्रभाकर कोरे

निपाणीतील महाआरोग्य शिबिरात दिली माहिती!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी- ता. (26) “रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा” हा उदात्त दृष्टीकोन ठेवून मार्गक्रमण करणाऱ्या आमच्या केएलई संस्थेकडून सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना शिक्षण सेवा देण्याच्या उद्देशाने केएलई संस्थेची स्थापना केली. त्यापाठोपाठ सेवा हा दृष्टिकोन ठेवून हॉस्पिटलची उभारणी केली. त्याच्या माध्यमातून हजारो रुग्णावर विविध प्रकारचे उपचार केले जात आहेत. लवकरच आयुर्वेदिक उपचार सेवाही सुरू होणार असल्याचे केएलई संस्थेचे संस्थापक माजी खासदार डॉ. प्रभाकर कोरे यांनी सांगितले.

ते काल बेळगाव येथील केएलई संस्थेचे संचालक अमित कोरे फॅन क्लब, केएलई जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज, डॉ. प्रभाकर कोरे रुग्णालय व वैद्यकीय संशोधन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने रविवारी 25 फेब्रुवारी रोजी निपाणी बागेवाडी महाविद्यालयात आयोजित मोफत महाआरोग्य तपासणी व औषध वाटप शिबिराचे उद्घाटन करून बोलत होते. डॉ. कोरे व मान्यवरांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. शिबिरात 15 हजारावर रुग्णांची तपासणी करण्यात आली.

डॉ. कोरे पुढे म्हणाले, ‘बेळगाव येथील आपल्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी चार देशातील रुग्ण येतात. 2400 खाटांचे हॉस्पिटल असूनही ते कमी पडत आहे. नागरिकांची दिनचर्या, आहार, विहार बदलल्याने अनेक प्रकारचे रोग होत आहेत. दररोज 10 पेक्षा अधिक कर्करोगाचे रुग्ण आढळत आहेत. निपाणीकरांच्या मागणीनुसार लवकरच आपल्या शहरात आयसीयू, डायलिसिस व इतर विभाग सुरु करण्याचा मानस आहे. डॉ. चंद्रकांत कुरबेट्टी, डॉ. ए. व्ही. कोठीवाले यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी प्राचार्य एम. एम. हुरळी यांनी स्वागत केले.

यावेळी व्हीएसएम संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले, केएलई संस्थेचे संचालक अमर बागेवाडी, मल्लाप्पा कोरे, बसवराज पाटील, रोटरी अध्यक्ष प्रवीण तारळे.सचिव राजेश तिळवे, राजेश पवार, महेश बागेवाडी,  गजेंद्र तारळे, मल्लिकार्जुन गडकरी, रवींद्र शेट्टी, समीर बागेवाडी, प्रताप मेत्राणी, डॉ. एस. आर. पाटील, संजय पाटील, डॉ. अल्लमप्रभू, सुनील पाटील, विजय मेत्राणी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!