क्रीडाताज्या घडामोडीनिपाणी परिसरमहाराष्ट्रशैक्षणिक

मोहनलाल दोशी विद्यालयामध्ये दहावीच्या विद्यार्थ्याना शुभेच्छा

प्रमुख पाहुणे म्हणून देवचंद कॉलेज मधील प्रा.भरत पाटील हे होते!

Kiran G.Patil M.No.8884357516


अर्जुननगर,येथील मोहनलाल दोशी विद्यालया मध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्याना शुभेच्छा समारंभ पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून देवचंद कॉलेज मधील प्रा.भरत पाटील हे होते. यावेळी त्यांनी दहावी बारावी नंतरच्या करियरच्या संधी सांगितल्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस एम गोडबोले यांनी दहावीच्या विद्यार्थ्याना परीक्षेसाठी व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी कु. आदर्शा पाटील , कु. धनश्री पोकले, कु श्रावणी संकपाळ , कु.अक्षता खवरे ,कु. अनुराधा सावंत यांनी मनोगते व्यक्त केली यावेळी व्यासपीठावर श्री.आर. एस. भोसले , शिक्षक प्रतिनिधी आर आर कपले कर्मचारी प्रतिनिधी बी एल तिप्पे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविक श्री.आर. डी. देसाई यांनी केले सुत्रसंचलन श्री.एस.बी.यादव यांनी तर आभार एन जे खेबुडे यांनी मानले कार्यक्रमाला जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिषभाई शाह यांच्यासह सर्व संचालकांचे प्रोत्साहन लाभले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!