ताज्या घडामोडीमहाराष्ट्रशैक्षणिक

देवचंद कॉलेजमध्ये स्वयंसिद्धा सचेतना फोरम मार्फत महिला आणि ताण तणावाचे व्यवस्थापन या विषयावर व्याख्यान!

मार्गदर्शन करताना प्रमुख वक्त्या प्रा.वैशाली पाटील होत्या!

Kiran G.Patil M.No.8884357516


देवचंद कॉलेजमध्ये स्वयंसिद्धा सचेतना फोरम मार्फत आरोग्य जनजागृती अंतर्गत महिला आणि ताण तणावाचे व्यवस्थापन या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना प्रमुख वक्त्या प्रा.वैशाली पाटील म्हणाल्या,

आपले विचार, बुद्धी, भावना आणि वर्तनात जेव्हा बिघाड निर्माण होते. तेव्हा त्याचा परिणाम आपल्या शरीरावर आणि मनावर होतो. आपला विचार करण्याच्या पद्धतीचा परिणामही आपल्या आरोग्यावर होत असतो. आपल्या अमर्याद इच्छा, आकांक्षा असणे, त्या आवक्या बाहेरच्या असणे, समोरची व्यक्ती आपल्या मनाप्रमाणे वागेलच असे नाही.  तेव्हा तशी मानसिकता ठेवावी, दुसऱ्याला कमी लेखू नये. ती व्यक्ती आपल्यापुढे गेली तर त्याचा त्रास आपल्यालाच होतो. अचानक अपघात होणे काही धक्कादायक गोष्टी घडणे यातूनच आघातजन्य मानसिक आजार निर्माण होतात. स्वतःला कमी लेखणे त्यामुळे आत्मविश्वासाचा अभाव निर्माण होतो.मानसिक आजारांचे शारीरिक आजारात रूपांतर होते.मानसिक आरोग्याविषयी जाणीवजागृती निर्माण होणे आज काळाची गरज बनली आहे. मनस्वास्थ्य उत्तम असणे हि मानसिक व शारीरिक आजार दूर ठेवण्यासाठी महत्वाचे आहे.मेंदूचे आरोग्य चांगले राहण्यासाठी मनातील विचार चांगले असावेत. कौटुंबिक जबाबदारी आणि सामाजिक भूमिका पार पाडत असताना स्वतःला सक्षम ठेवण्यासाठी मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. या आरोग्याकडे वेळीच महिलांनी लक्ष द्यावे असेही आवाहन त्यांनी केले.

 या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष आशिषभाई शाह, उपाध्यक्ष तृप्तीभाभी शाह महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.जी.डी.इंगळे यांचे प्रोत्साहन आणि मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक स्वयंसिध्दा सचेतना फोरमच्या समन्वयक डॉ.सुषमा जाधव यांनी केले. डॉ . सुप्रिया देसाई यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी प्रा.डॉ. सुजाता पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!