आपला जिल्हाताज्या घडामोडीनिपाणी परिसरराजकीय

जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांची बुडा अध्यक्षपदी वर्णी!

दरम्यान चिंगळे यांची बुडा अध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांच्या समर्थकांसह कार्यकर्त्यांनी जल्लोष केला!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी विधानसभा मत क्षेत्रातील काँग्रेसचे एकनिष्ठ नेते म्हणून ज्यांची ओळख आहे असे चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांची बेळगाव येथील बुडाच्या (बेळगाव नगर विकास प्राधिकरण) अध्यक्षपदी निवड झाली. ही निवड राज्य सरकारने जाहीर केली. दरम्यान चिंगळे यांची बुडा अध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांच्या समर्थकांसह कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

लक्ष्मणराव चिंगळे यांनी यापूर्वी खादी ग्रामोद्योग महामंडळाच्या अध्यक्ष पदासह अपेक्स व बेळगाव डी.सी.सी. बँकेच्या संचालक पदावरही काम केले आहे. ते काँग्रेसचे निष्ठावंत नेते असून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. लक्ष्मणराव चिंगळे यांनी आतापर्यंत पक्षासाठी दिलेल्या योगदानाची दखल राज्य सरकारने घेतली आहे. विशेष म्हणजे त्यांनी चिकोडी जिल्हा ब्लॉक काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडून चिकोडी लोकसभा मतदारसंघातून गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत आठ पैकी सहा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार निवडून आणण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा ठरला आहे. या निवडीमुळे निपाणीसह तालुक्यातील काँग्रेस प्रेमी कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांच्यातून आनंदोत्सव साजरा केला जात आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!