ताज्या घडामोडीनिपाणी परिसरराजकीय

निपाणी टाऊन प्लॅनिंग चेअरमनपदी निकु पाटील यांची एकमताने निवड!

अध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरपालिकेचे पहिले नगराध्यक्ष कै. दौलतराव पाटील यांचे नातू, निपाणी मतदारसंघाचे लोकप्रिय माजी आमदार काकासाहेब पाटील यांचे भाचे व कृषिधन दूध संस्था, दौलतराव पाटील सोशल फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष श्री संयोजित उर्फ निकु पाटील यांची निपाणी टाऊन प्लॅनिंग चेअरमन पदी निवड करण्यात आली…

निकु पाटील हे आजच्या युवा पिढीसाठी एक आदर्श व्यक्तिमत्व असून काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून पंचक्रोशीत ओळखले जातात, पक्षाच्या विस्तारासाठी निकु पाटील यांनी आज पर्यंत प्रामाणिकपणे काम केले आहे.. महापूर आणि कोरोना काळात गरजूंना पदोपदी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांची टाऊन प्लॅनिंग अध्यक्षपदी निवड झालेली असल्याने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

या प्रसंगी, सर्व काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते नेते प्रतिष्ठित नागरिक, मित्रमंडळी, युवावर्ग निकु पाटील ना चेअरमन पदी निवडी  निमित्त पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या..

या वेळी निपाणी ब्लॉक अध्यक्ष राजेश कदम, युवा नेते रोहन साळवे, माजी नगराध्यक्ष विजय शेटके ,नवनाथ चव्हाण, संदीप चावरेकर, यांच्यासह निकु पाटील प्रेमी, काँग्रेस कार्यकर्ते, मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते..

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!